Home > मॅक्स रिपोर्ट > डोळ्याला धोका देणारे आरशातलं, भारताचे वास्तवादी चित्र

डोळ्याला धोका देणारे आरशातलं, भारताचे वास्तवादी चित्र

डोळ्याला धोका देणारे आरशातलं, भारताचे वास्तवादी चित्र
X

स्वातंत्र्याच्या 7६ वा महोत्सव देशभरातून वेगवेगळ्यांमाध्यमातून साजरा केला जात आहे. देशातील सद्यस्थिती आणि संविधानिक मूल्य यांना अनुसरून सध्याच्या भारताचे वास्तववादी चित्र मुंबईतील (वरळी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहणारा आणि जे जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेत असणारा उत्तम कैलाश खानजोडे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आरशात भारताचे वास्तववादी चित्राचे सादरीकरण केलं आहे. कानपूरचे प्रकरण असो किंवा दिल्लीत जंतर-मंतरवर झाळलेल संविधान, बलात्कारांचे वाढते प्रमाण अशी देशातील ज्वलंत विषयांवर पोखरलेले सफरचंद आणि वास्तवात असणारे इंन्स्टॉलेशन असवली चित्रकला सादर केली आहे.

यात आरशात दिसणाऱ्या सफरचंदाच्या दोन्ही बाजू देशाच्या वास्तव्यावर भाष्य करणाऱ्या आहेत, महिला अत्याचार, जातीय उत्पडी, भ्रष्टाचार, असुरक्षिततेच्या भितीने ग्रस्त असलेला भारत, शेतकरी आत्महत्या, महाराष्ट्रातील कलंकीत राजकारण, आणि एक दिवसापुर्ति राष्ट्रभक्ती तर दुसऱ्या बाजुने झाक‌लेला भारत, खोट्याचा भोण्याचा, आणी संविधानीक मूल्यांची पायमल्ली होणारे वास्तवा दर्शवले आहे..

तुटत आणी आपल्या हातातून सुटत चाललेल्या भारताला एकजुट होऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय रूजवण्याचा संदेश या तरुणाने आपल्या कलाकारीतून दर्शवला आहे. स्वातंत्र्य फक्त उत्सव नाही, तर जबाबदारी आहे हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घ्यायला हवं...

कृष्णा कोलापटे


Updated : 17 Aug 2023 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top