Home > Election 2020 > अमित शाहा, योगी आदित्यनाथ यांच्यानंतर राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी

अमित शाहा, योगी आदित्यनाथ यांच्यानंतर राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी

अमित शाहा, योगी आदित्यनाथ यांच्यानंतर राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी
X

देशात सुरु असलेल्या निवडणूकीत नेते देशभर सभा घेत आहेत. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजप असो किंवा कॉंग्रेस नेत्यांना सभा घेणं अवघड झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली होती. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या देखील हेलिकॉप्टरला ममता बॅनर्जी यांनी परवानगी नाकारली होती.

त्यानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून राजकीय नेते सभांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. मात्र, पश्चिम बंगाल सरकार सभांसाठी हेलिकॉप्टरची परवानगी देत नसल्याचं समोर आलं आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि दार्जिलिंग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शंकर मलाकार यांनी या संदर्भात माहिती दिली: पोलीस ग्राऊंडवर 14 एप्रिलला राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी याला परवानगी नाकारली आहे. परिणामी राहुल गांधी यांची सिलीगुडी येथील जाहीर सभा रद्द करावी लागली आहे.

सिलिगुडीचे पोलीस आयुक्त बी.एल. मीणा यांनीही राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली असल्याचं म्हटलं आहे.त्या म्हणाल्या 'आम्ही त्या ग्राऊंडवर परवानगी नाकरली आहे. काही नियम आहेत, त्यामुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, याशिवाय त्यांना दुसरा पर्याय आणला नव्हता.'

त्यामुळे आता पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Updated : 13 April 2019 6:14 AM GMT
Next Story
Share it
Top