Home > मॅक्स रिपोर्ट > राज्यभरातील दिव्यांग शिक्षणापासून वंचित

राज्यभरातील दिव्यांग शिक्षणापासून वंचित

राज्यातील शाळा महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे मात्र राज्यातील दिव्यांग विद्यार्थी या शैक्षणिक प्रक्रियेपासून अद्यापही वंचित असल्याचं धक्कादायक वास्तव आता पुढे आला आहे शा ठेवण्याचं ठरवलं आहे का?असा सवाल आता या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे, प्रतिनिधी गौरव मालक यांचा रिपोर्ट...

राज्यभरातील दिव्यांग शिक्षणापासून वंचित
X

राज्यातील शाळा महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे मात्र राज्यातील दिव्यांग विद्यार्थी या शैक्षणिक प्रक्रियेपासून अद्यापही वंचित असल्याचं धक्कादायक वास्तव आता पुढे आला आहे शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ठेवण्याचं ठरवलं आहे का? असा सवाल आता या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे, प्रतिनिधी गौरव मालक यांचा रिपोर्ट...

राज्यात शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात असलेल्या निवासी शाळा गेल्या दोन वर्षापासून बंद आहेत. यामुळे हे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून लांब फेकले जाण्याची भीती आहेत. विशेषतः दृष्टी बाधीत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला आहे. हे विद्यार्थी ब्रेल लिपी च्या माध्यमातून स्पर्शाच्या साह्याने शिक्षण घेतात मात्र दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांचा या लिपीशी संपर्क तुटला आहे शिवाय गणित, विज्ञान, क्रीडा हे विषय या विद्यार्थ्यांना स्पर्शात च्या साह्याने शिकवले जातात. मात्र ऑनलाईन शिक्षण प्रणाली मध्ये हे शक्य नाही शिवाय राज्यभरात अनुदानित व विनाअनुदानित मिळून 850 च्या आसपास दिव्यांग शाळांची संख्या आहे.

आधीच शासन व प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे मग आता राज्यात सर्वत्र शाळा महाविद्यालय सुरू होत असताना या शाळा बंद का? असा प्रश्न आहे.


आम्ही यासंदर्भात राज्यभरातील अनेक विद्यार्थी व पालक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथे इयत्ता सातवी मध्ये शिकणारा करण पवार सांगतो,`` गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे खरंच मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. कारण विज्ञान, गणित, संगीत यासारखे विषय ऑनलाइन पद्धतीने शिकणे ही अत्यंत अशक्य गोष्ट आहे. शाळा सुरू असल्यानंतर हे विषय शिक्षक आम्हाला स्पर्शाच्या माध्यमातून शिकवतात याच बरोबर संगणक सुद्धा ऐकून शिकावा लागतो. आता माझ्याकडे घरी परिस्थिती खराब असल्यामुळे संगणक नाही मग तो मी कसा शिकणार ? सरकारने इतर डोळस मुलांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मग आमच्यावरच कायम अन्याय कशासाठी?``. आम्ही दिव्यांग म्हणून जन्माला आलो हे पाप आहे का? असा सवाल करण्याने सरकारला विचारला आहे?

पालक तुकाराम पवार सांगतात, ``दोन वर्षापासून माझा मुलगा हा घरीच आहे शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पण ते त्याला समजत नाही. त्यामुळे तू सतत चिडचिड करतो. आणि मला एक कळत नाही सरकार इतर मुलांच्या शाळा सुरू करत आहे मग या मुलांचा का नाही? सरकारमधल्या मंत्र्यांनी एक दिवस डोळ्यावर पट्टी बांधून काम करून पहावं. त्याशिवाय माझ्या मुलाच्या वेदना यांना कळणार नाही, अशी प्रतिक्रिया तुकाराम पवार यांनी दिली आहे.

आता आम्ही या संदर्भात या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक योगेश चौधरी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, `` आपले पंचेंद्रिय त्यांच्यापैकी 83 टक्के ज्ञान हे डोळ्यांच्या माध्यमातून मिळवता येतं उर्वरित 17 टक्के इतर इंद्रियांची क्षमता असते मात्र हेच 83 टक्के नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. दोन वर्षापासून शाळा बंद आहेत यामुळे दृष्टी बाधीत विद्यार्थ्यांना याचा किती फटका बसत आहे याचा विचार कोणी केला आहे का? या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शाळा या सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविल्या जातात. मात्र या विद्यार्थ्यांना सामाजिक नाय फक्त नावाला असल्याचे चित्र आहे. शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली संदर्भात काढलेला शासन निर्णय तसाच्या तसा रेटत अपंग कल्याण आयुक्त यांनी कुठल्याही तज्ञ यांच्याशी चर्चा न करता कागदी घोडे नाचवून लाडला शिवाय अनेक संस्थांनी आपल्या हितासाठी हा निर्णय योग्य असल्याचे सांगत या निर्णयाला दुजोरा दिला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

मात्र प्रत्यक्षात ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही दृष्टी बाधित विद्यार्थ्यांना घातक आहे असे माझे मत आहे कारण ब्रेल लिपी हा या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया असते मात्र या लिपीमध्ये शिक्षण देणे ऑनलाइन प्रणाली मध्ये शक्य नाही.

आता आम्ही डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथील मुख्याध्यापक नवनाथ इंगोले यांना यासंदर्भात विचारणा केली, विद्यार्थ्याला आठवी पर्यंत पास करण्यात यावं अशा पद्धतीचे शासनाचे धोरण आहे मात्र एखादा विद्यार्थी 2020 या वर्षात पहिली मध्ये आला असेल तेव्हापासून तू आता तिसरी मध्ये आहे. मात्र दरम्यानच्या काळात त्याच्या शिक्षणाप्रती असलेल्या संकल्पना विकसित झालेल्या नाहीत याचा विचार झाला आहे का? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अशाच शाळा जर बंद राहिल्या तर शिक्षणाच्या प्रवाहात येणारी दृष्टी बाधीत विद्यार्थ्यांची नवीन फळी निश्चितच या प्रवाहाच्या बाहेर असेल. हे मात्र निश्चित त्यामुळे लवकरात लवकर या शाळा सुरू कराव्यात. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. मात्र आम्ही प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक इंगोले यांनी दिली आहे.

आता आम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या? अंधजन मंडळ मुंबई महासचिव हर्षद जाधव सांगतात,कधी उघडणार अंध-अपंगांसाठीच्या विशेष शाळा विद्यार्थ्यांसाठी? राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय अनेकदा घेऊन परत घेतला. आता पुन्हा एकदा १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. पण एप्रिल २०२० पासून बंद झालेल्या अंध-अपंगांसाठीच्या विशेष शाळा मात्र विद्यार्थ्यांसाठी आजही बंदच आहेत.या नव्या निर्णयानुसार त्या उघडणार की नाहीत हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

मुळात शासनाच्या शालेय शिक्षण आणि सामाजिक न्याय या दोन विभागांच्या कात्रीत कायम सापडलेला असा हा विशेष शाळांचा प्रश्न आहे. अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे सर्वाधीक प्रभावी माध्यम हे ब्रेल लिपीच आहे. ते प्रत्यक्ष हाताळणीनेच शिकवले जाऊ शकते. गणित इ. विषयांसाठीच्या गणित पाटी वा अबेकस सारख्या साधनांचही असंच आहे. दूरदूरच्या गावखेड्यांत पसरलेल्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिकवणे शिक्षकांच्या अवाक्या बाहेरचे आहे. गेली २ वर्षे बंद असलेल्या विशेष शाळांत प्रवेश घेतलेल्या पुर्व प्रार्थमीक व प्रार्थमीक वर्गांतील विद्यार्थ्यांना हे प्रत्यक्षदर्शी शिक्षण मिळतय का?

याचा कोणताही विचार ना राज्याच्या शिक्षण विभागाने केलेला दिसतोय ना सामाजीक न्याय विभागाने ना विशेष शाळांच्या संस्थाचालकांनी. शाळांनी पाठवलेल्या कागदी पुराव्यांवर हे विशेष शाळांतील शिक्षण योग्य सुरू असल्याची बतावणी करण्यापलिकडे राज्य शासनाचे कोणतेही कतृत्व या काळात समोर आलेले नाही.

सर्वशिक्षा अभियान, समायोजीत शिक्षण वा एकात्म शिक्षणासारख्या योजनांच्या परिघात नसलेल्या या विशेष शाळांतील सर्वच स्तरांवरील विद्यार्थ्यांचं या काळात न भरून येणारं नुकसान झालं आहे. पण याची थोडीशीसुद्धा जाण राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना असल्याचे जाणवत नाही. आम्ही यासंदर्भात दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी कायम प्रयत्नशील असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया जाणून घेतली Max Maharashtra ने निदर्शनास आणून दिलेली बाब महत्त्वाची आहे व यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री कडू यांनी दिली.

Updated : 31 Jan 2022 8:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top