Home > मॅक्स रिपोर्ट > पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
X

आठवड्याच्या पहिल्याच दिवशीचं पावसाने पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री केली आहे. गेल्या आठवड्यातही पावसाने असाच जोर धरला होता. आज सकाळापासूनच मुंबईसह उपनगरात सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तसेच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी काही गाड्या १५ मिनिटे उशिरानं धावत आहेत. मध्य रेल्वेवरील विक्रोळी ते कांजूरमार्ग स्थानकादरम्यान पाणी साचलं होतं. आता ते ओसरण्यास सुरुवात झाली आहे. बेस्ट वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला. अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. विमान वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली होती. मुसळधार पाऊस आणि दृष्यमानता कमी झाल्यानं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली होती. नवी मुंबई, ठाण्यातही पाऊस जोरदार बरसला. पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Updated : 8 July 2019 7:15 AM GMT
Next Story
Share it
Top