Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : मुंबई स्वच्छ ठेवणारेच बेघर, सुप्रीम कोर्टाचे आदेशही कचऱ्यात?

Ground Report : मुंबई स्वच्छ ठेवणारेच बेघर, सुप्रीम कोर्टाचे आदेशही कचऱ्यात?

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न गंभीर आहे. पण हजारो बेघरांना निवारा नसल्याने ते रस्त्यावरच राहत आहेत. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील काही कुटुंब कष्टाने आणि सन्मानाने जगावे म्हणून मुंबईत आले खरे, पण त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे, याचा आढावा घेणारा प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Ground Report : मुंबई स्वच्छ ठेवणारेच बेघर, सुप्रीम कोर्टाचे आदेशही कचऱ्यात?
X

स्वप्ननगरी मुंबई प्रत्येकाचे पोट भरते म्हणून इथे दररोज हजारो लोक येत असतात...पण मुंबईची दुसरी बाजू देखील आहे.. ही दृश्य आहेत बोरिवलीतील चिक्कुवाडी परिसरातील. सुमारे 20 वर्षांपासून पारधी समाजातील लोकांना निवारा नाही म्हणून ते या ठिकाणी झोपडी करुन रहायला लागले. यातील अनेकांना महापालिका तुंबलेला नाला, गटारं साफ करणे आणि इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामाला बोलावते. पण त्यांच्या झोपड्या अनधिकृत म्हणून त्यांच्यावर नियमितपणे कारवाई केली जाते.






अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न गंभीर असला तरी मुंबईतील बेघरांसाठी निवारागृहाची सोय करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही पुरेशी कारवाई झाली नसल्याचे दिसते आहे. मुंबईत सध्या बेघरांचा आकडा 54 हजार 416 आहे. आहे. पण महापालिकेने 2010 ते 2020 या दहा वर्षात फक्त 23 निवारे बेघरांसाठी बांधील असल्याने निवारा गृहात बेघारांचा आकडा हजारांच्या वर जात नाही. नाईलाजस्तव बेघरांना रस्त्यावर राहावं लागतं. या बेघरांकडे कोणताच शासकीय पुरावा नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.








प्लॅनिंग डिपार्टमेंटचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांना भेटून संबंधित बेघरांचा प्रश्न का सुटला नाही याबाबत विचारले असता यासंबंधी माहिती घेऊनच बोलेन एवढेच त्यांनी सांगितले. हे मतदार नसल्यामुळे कदाचित त्यांच्या घरांचा प्रश्न सुटतही नाही आणि चर्चेतही येत नाही.

Updated : 17 Sep 2022 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top