Home > मॅक्स रिपोर्ट > #गावगाड्याचे_इलेक्शन : खेड्य़ाकडे चला संदेश देणारे कोकणातील गाव !

#गावगाड्याचे_इलेक्शन : खेड्य़ाकडे चला संदेश देणारे कोकणातील गाव !

गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असे म्हणतात...हाच संदेश दिला आहे कोकणातील एका गावाने...रोजगारासाठी गावातून मुंबईला होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या गावच्या ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. पाहा आमचे प्रतिनिधी कौत्सुभ खातू य़ांचा ग्राऊंड रिपोर्ट....

#गावगाड्याचे_इलेक्शन : खेड्य़ाकडे चला संदेश देणारे कोकणातील गाव !
X

कोकणातील माणसाचं मुंबईचे नेहमीच एक वेगळे आणि खास नाते राहिल आहे. आधी घरातील एक व्यक्ती रोजगाराच्या शोधात मुंबईत येते, रोजगार मिळवते आणि उतारवयात पुन्हा गावाला येते. त्या व्यक्तीनंतर त्यांची मुल कामाच्या शोधात मुंबई गाठतात..रोजगाराच्या शोधात स्थलांतराचे हे चक्र गेली अनेक वर्ष सुरु आहे. तरुणांचे हे स्थलांतर रोखणं प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नेहमीच आव्हान राहिलं आहे. पण या आव्हानाला तोंड दिलंय ते रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातल्या सिद्धेश्वर गावाने..

या गावाने तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिकांना रोजगार दिला. यात कुक्कुट पालन, शेळी पालन, शेतीसाठी ट्रॅक्टर, विटभट्टी, असे विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली. याच गावात दोन आदिवासी पाडेही आहेत. या पाड्यांवर पाण्याची बिकट अवस्था होती. उन्हाळ्यात या लोकांना पाण्याच्या समस्येमुळे शहराच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागायचे. या प्रश्नावरसुद्धा गावाने तोडगा काढला. श्रमदनातून दोन मोठे व एक छोटा असे तीन बंधारे बांधण्यत आले. ज्याचा परिणाम दोन वर्षांनी दिसला. आजच्या घडीला हे आदिवासी बांधव याच पाण्यावर आपल्या विट भट्टया चालवतात. गावाने हे सर्व केस केले याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांनी....



Updated : 5 Jan 2021 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top