Home > मॅक्स रिपोर्ट > #गावगाड्याचे इलेक्शन- पिंजऱ्यातील मत्स्यशेती करणारे गाव

#गावगाड्याचे इलेक्शन- पिंजऱ्यातील मत्स्यशेती करणारे गाव

कोकणातील एका गावाने मत्स्यशेतीचा अनोख प्रयोग केल्याने इथून रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी झाले आहे. पाहा आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

#गावगाड्याचे इलेक्शन- पिंजऱ्यातील मत्स्यशेती करणारे गाव
X

डोंगर-दऱ्या, कातळ जमीन आणि समुद्र ही कोकणाची ओळख.... अशा भौगोलिक परिस्थितीत भातशेती मासेमारी व बागायती शेती हा कोकणवासीयांचा मुख्य व्यवसाय आहे. अशा या पारंपरिक व्यवसायात विविध प्रयोग करुन रोजगार वाढवण्याचा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हाडी या गावाने केला आङे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध केल्याने इथल्या तरुणांना रोजगार मिळाला आहे. ग्रामपंचायतीने गावकऱ्यांचे १६ बचतगट तयार केले. सध्या या बचतगटांमार्फत पिंजऱ्यातील मत्स्यशेती केली जाते. या नवीन शेतीमुळे गावाला एक नवी ओळख प्राप्त झाली असून यातून तरुणांना रोजगार मिळाला आहे.

Updated : 8 Jan 2021 12:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top