Home > मॅक्स रिपोर्ट > मंत्र्यांपुढे प्रश्न मांडायचे नाहीत तर कुणाकडे मांडायचे? संतप्त पालकाचा सवाल

मंत्र्यांपुढे प्रश्न मांडायचे नाहीत तर कुणाकडे मांडायचे? संतप्त पालकाचा सवाल

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप संघर्षात जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते आहे, असे सांगितले जाते. पण सामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले की त्यांचा कसा उद्रेक होतो याचे उदाहरण जळगाव जिल्ह्यात समोर आले आहे. पाहा तिथे दोन मंत्र्यांसमोर काय घडले.

मंत्र्यांपुढे प्रश्न मांडायचे नाहीत तर कुणाकडे मांडायचे? संतप्त पालकाचा सवाल
X

मंत्र्यांपुढे प्रश्न मांडणार नाही तर मग कुठे प्रश्न मांडायचे, असा सवाल एका पालकाने थेट उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारला आहे. हा प्रकार जळगावमध्ये घडला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एका पालकाने जी एच रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजने कोरोना काळात आपल्याला मुलांच्या फी साठी त्रास दिला असा आरोप करत आपली कैफीयत मांडण्याचा प्रयत्न केला. आपण फी भरुनही संस्थेने मुलाचा निकाल दिला नाही, संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. पण यावेळी त्यांनी या कार्यक्रमात आपल्याला माईकवरु बोलू द्यावे अशी मागणी केली. पण त्यांना तसे बोलू देण्यास नकार दिल्याने संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी ते पालक आणि गुलाबराव पाटील यांच्या शाब्दिक चकमक देखील झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना बाहेर काढले या विद्यापीठात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्यांच्या समस्या शिक्षणमंत्र्यांनी ऐकून घेतल्या आणि चौकशी करुन कारवाईचे आश्वास दिले आहे.

Updated : 26 Feb 2022 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top