Home > News Update > लस दिल्यानंतर दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

लस दिल्यानंतर दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

लस दिल्यानंतर दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल
X

पालघर : जिल्ह्यातील कोशिमशेत या गावात एका १६ महिन्यांच्या मुलाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप होतो आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कोशिमशेत या ठिकाणी घडली आहे. मृत्यू पावलेल्या सर्वेश अशोक धोडी ह्याला १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य वाशाळाच्या नर्सने घरी जाऊन या एम आर व ट्रिपल बूस्टर डोस दिला होता. पण सर्वेशला 9 तारखेला 16 महिने पूर्ण झाले असल्याने उशिराने डोस द्या असे आपण नर्सला सांगितले पण त्यांनी ऐकले नाही, असा आरोपा सर्वेशच्या आई मंगला धोडी यांनी केला आहे.

हा डोस दिल्यानंतर थोड्या वेळातच सर्वेशला ताप आला, पण डोस दिल्याने ताप आला असावा असे वाटल्याने त्याच्या आईने नर्सने दिलेले औषध त्याला दिले. पण तरीही त्याला बरे न वाटल्याने 12 तारखेला त्याचे कुटुंबिय त्याला खोडाळा येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. पण ताप खूप असल्याने बाळाला आकड्या येत असल्याने खाजगी दवाखान्यात त्याच्या उपचार करण्यात आले नाही, असाही आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. खासगी दवाखान्याच्या डॉक्टरांनी त्याला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी लगेच मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उपचारा आगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, तसेच आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याची टीका होते आहे.

सर्वेशच्या कुटुंबियांनी याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली आहे. तसेच आरोग्य विभागातर्फेही या प्रकरणी चौकशी करत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी दिली आहे.

Updated : 15 Feb 2022 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top