Home > Election 2020 > पाणी दिलं म्हणून दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

पाणी दिलं म्हणून दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

पाणी दिलं म्हणून दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
X

पगारवाढ आणि नोकरीत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी दूरदर्शनच्या हंगामी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. मुंबईतल्या वरळी दूरदर्शन केंद्राबाहेरच आंदोलनाला बसलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांना दूरदर्शनच्या स्थायी कर्मचाऱ्यांनी चहा-पाणी दिलं म्हणून त्यांच्यावरच कारवाई करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.

काम बंद आंदोलन कशासाठी ?

मागील १० ते २५ वर्षांपासून दूरदर्शनच्या विविध विभागात सुमारे शंभरावर अधिक कर्मचारी काम करत आहेत. त्यांना १० ते २० हजारा दरम्यान वेतन दिलं जातंय. दूरदर्शनच्या सेवेतील स्थायी कर्मचारी आणि हंगामी अस्थायी कर्मचारी यांच्या कामांचं स्वरूप सारखंच आहे. मात्र, वेतनातील तफावत ही फार मोठी असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्या हंगामी कर्मचाऱ्यांचा आहे. दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पगारवाढीची आश्वासनं अनेकदा दिली, मात्र पुढे काहीच झालं नसल्याचं या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

पाणी देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच कारवाई

इतक्या वर्षांपासून एकत्र काम केल्यानं आपुलकीच्या भावनेतून स्थायी कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्यानं आंदोलनाला बसलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांना पाणी दिलं म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं निलेश गायकवाड या आंदोलक कर्मचाऱ्यानं सांगितलं.

भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांच्या नातलगांचाच कार्यक्रमात समावेश

स्वच्छ भारत मिशन किंवा सरकारच्या योजनासंदर्भातल्या कार्यक्रमांसाठी भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचं चित्रिकरण केलं जायचं. चित्रिकरण झाल्यानंतर त्यांना ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम दिली जाते, असंही एका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर मॅक्स महाराष्ट्रला सांगितलंय.

Updated : 4 May 2019 12:25 PM GMT
Next Story
Share it
Top