Home > मॅक्स रिपोर्ट > दोन हजार रुपयात कुटूंबातील 4 जणांना अडीच महिने राबवले ; गुन्हा दाखल...

दोन हजार रुपयात कुटूंबातील 4 जणांना अडीच महिने राबवले ; गुन्हा दाखल...

दोन हजार रुपयात  कुटूंबातील 4 जणांना अडीच महिने राबवले ; गुन्हा दाखल...
X

रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या आणि दोन हजार रुपयात कुटूंबातील 4 व्यक्तींना अडीज महिने राबवनाऱ्या कातकरी कुटूंबाची पिळवणूक केल्या प्रकरणी खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या आणि दोन हजार रुपयात कुटूंबातील 4 व्यक्तींना अडीज महिने राबवनाऱ्या कातकरी कुटूंबाची पिळवणूक केल्या प्रकरणी खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील महादू मुकणे वय (60 वर्ष) लक्ष्मीबाई वय( 55वर्ष) पत्नी मुलगा गणेश वय( 15 वर्ष) व मुलगी सविता(12 वर्ष) हे कुटूंब जून महिन्यात गणेशवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे दगडखानीच्या कामाला स्थलांतरित झाले होते यावेळी एक ट्रॅक्टर दगड भरण्यासाठी 500 रुपये मजुरी देण्याचे ठरले होते परंतु खदान मालकाने त्यांच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन या कातकरी कुटूंबाची पिळवणूक करून फसवणूक केली असल्याचा आरोप या पीडित कुटूंबाने केला आहे

येथे खदानीत काम करत असताना मालकाकडून जबरदस्तीने अवजड कामे करून घेतली जात कामे न केल्यास शिवीगाळ दमदाटी केली जात असे तसेच दोन ते अडीज महिने काम करूनही त्यांना कामाचा मोबदला देखील दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला असून 2000 हजाराच्या दिलेल्या आगाऊ रक्कमेत चार व्यक्तींना अडीज महिने राबवून घेतले आहे

यामुळे मालकाच्या पिळवणुकीला कंटाळुन अखेर 14 तारखेला काम सोडून घरी जाण्याचा निर्णय या कुटूंबानी घेतला परंतु भाड्याला पैसे नसल्याने महादू मुकणे हे तिथूनच पायीपायी निघाले तर थोडीफार शिल्लक असलेल्या गंजीपुंजीतुन गणेश सविता व त्यांची आई लक्ष्मीबाई कसेबसे गाडीभाडा करुन त्यांनी त्रिंबकेश्वर गाठले व तेथून पायीपायी येत असताना दुपारी 12:30 च्या दरम्यान त्रिंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष जवळ नवसू गारे संतोष झिंजुर्डे लक्षण खाडे राजू पालवे या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच संघटनेच्या वरिष्ठ पद्धधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

त्या नंतर त्यांनी त्यांच्या वाहनाने मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी पीडित कुटूंबाची भेट घेऊन संघटनेच्या पुढाकाराने त्या मालकावर वेठबिगरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी संघटनेचे विजय जाधव सीता घाटाळ मोखाडा तालुका अध्यक्ष पांडू मालक आदी पद्धधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे करत आहेत.

एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा होत असून त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिला विराजमान झाल्या आहेत परंतु दुसरीकडे आदिवासी समाजातील आदिम अनेक कातकरी कुटूंब वेठबिगारीच्या पाशात अडकली आहेत अश्या शेकडो कुटूंबाकडे शेती नाही घर नाही शासकीय कागदपत्रे नाहीत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या पीडित कुटूंबानी मतदानाचा अधिकार बजावलेला नाही याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत विवेक पंडितांनी खेद व्यक्त केला.

Updated : 17 Sep 2022 9:56 AM GMT
Next Story
Share it
Top