Home > Election 2020 > अब्जाधीश बारणेंवर ४ लाखांचे वाहन कर्ज

अब्जाधीश बारणेंवर ४ लाखांचे वाहन कर्ज

अब्जाधीश बारणेंवर ४ लाखांचे वाहन कर्ज
X

मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडे १०२ कोटी ५० लाख रूपयांची संपत्ती आहे. मात्र, तरीही त्यांच्यावर ४ लाख १६ हजार ६१२ रूपयांचं वाहन कर्ज असल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केलेलं आहे.

२०१४ च्या शपथपत्रानुसार बारणे यांची संपत्ती ही ६६ कोटी ३३ लाख रूपये होती. त्यात मागील पाच वर्षांत ३६ कोटी ३३ लाख रूपयांची वाढ झाली आहे.

श्रीरंग बारणे यांच्या संपत्तीचा तपशील

जंगम मालमत्ता

श्रीरंग बारणे – १३ कोटी २० लाख ८८ हजार ९६४ रूपये

सरिता बारणे – ५७ लाख ५ हजार

स्थावर मालमत्ता (वारसाप्राप्त मालमत्तेसह)

श्रीरंग बारणे – ६९ कोटी ६० लाख ५७ हजार ८५६ रूपये

सरिता बारणे – १८ कोटी ९४ लाख ५७ हजार ६६८ रूपये

एकूण – १०२ कोटी ३३ लाख १० हजार १३४ रूपये

Updated : 12 April 2019 10:18 AM GMT
Next Story
Share it
Top