Home > मॅक्स रिपोर्ट > भाजप, धक्काबुक्की आणि महिला दिन

भाजप, धक्काबुक्की आणि महिला दिन

भाजप, धक्काबुक्की आणि महिला दिन
X

भाजपनं मिरा भाईंदरमध्ये बुधवारी महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात महिलांना सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केली, ती सुद्धा पोलिसांच्या डोळ्या देखत.

खरंतर महापालिकेच्या या कार्यक्रमाची भाजपनं स्वतःच्या नावानं वेगळी निमंत्रण पत्रिका छापून कार्यक्रम पक्षाचा असल्याचं भासवलं. त्याचबरोबर कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांना चहा, नाष्टा आणि गिफ्ट देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. त्यासाठी निमंत्रण पत्रिकेसोबत कुपन सुद्धा भाजपनं वाटली.

महिलांना वाटण्यात आलेले कुपन

तीन तासापेक्षा जास्त वेळ झाला तरी कार्यक्रम संपत नाही आणि गिफ्ट सोडा साधा चहा सुद्धा मिळत नाही हे लक्षात आल्यावर महिलांनी काढता पाय घेतला. महिला निघून जात आहेत हे लक्षात येताच भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी लागलीच माईकवर येऊन सर्व महिलांना गिफ्ट देण्यात येईल असं जाहीर केलं.

https://youtu.be/fAXZ0FGIbqo

आमदारांच्या या घोषणेनंतर महिलांना गिफ्टचं वाटप सुरू झालं. पण महिलांची एकच झुंबड उडाली. त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी काही महिलांना धक्काबुक्की केली. विशेष म्हणजे पोलीस समोर उभे असतांना हा सगळा प्रकार घडला.

खरंतर हा कार्यक्रम मिरा-भाईँदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागानं आयोजित केला होता. पण, भाजपनं तो हायजॅक केला. गिफ्टच आमिष दाखवून महिलांना २०-२० रुपयांना मिळणारी साधी पाऊच वाटली. त्यामुळे अनेक महिला संतप्त झाल्या.

या एकाच कार्यक्रमाचा दोन वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापण्याच आल्या होत्या. पालिकेची अधिकृत निमंत्रण पत्रिका तर भाजपची अनधिकृत निमंत्रण पत्रिका.

भाजपनं कार्यक्रम हायजॅक केला आहे हे लक्षात येताच शिवसेनंन या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आलेल्या महिला नगरसेविकांना इलेक्ट्रीक शेगडी, पालिकेच्या शिक्षिका आणि महिला कार्मचाऱ्यांना कुकर, असे महागडे गिफ्ट देण्यात आले.

Updated : 9 March 2017 4:51 AM GMT
Next Story
Share it
Top