Home > मॅक्स रिपोर्ट > पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का...

पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का...

पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का...
X

भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन पुन्हा राजकीय वातावरण तापू लागले आहे. भगवानगडावर राजकीय सभेला यंदाही परवानगी देता येणार नाही, असं भवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे. नामदेवशास्त्रींच्या या भूमिकेनं यावर्षी पुन्हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरूद्ध नामदेवशास्त्री यांचा संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यावरून तीव्र संघर्ष झाला होता. गोपिनाथ मुंडे वर्षानुवर्षे भगवानगडावर दसरा मेळावा घेत आले होते. पण त्यांच्यांनंतर भगवानगडावर राजकीय सभा घेण्यास नामदेवशास्त्री यांनी गडाचे महंत म्हणून विरोध दर्शवला. त्या विरोधाला पंकजा मुंडे यांनी आव्हान दिले होते. मात्र नामदेवशास्त्री विरोधावर टाम राहिल्याने गेल्या वर्षी पंकजा मुंडेंना आपला मेळावा गडाच्या पायथ्याला घ्यावा लागला होता. आता यावर्षीही नामदेवशास्त्रींनी आपला विरोध कायम ठेवला असल्यानं पुन्हा संघर्ष होणार आहे.

Updated : 12 Sep 2017 11:37 AM GMT
Next Story
Share it
Top