Home > News Update > बीडच्या परळीत थरार , मनोरुग्णाकडून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न

बीडच्या परळीत थरार , मनोरुग्णाकडून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न

बीडच्या परळीत थरार , मनोरुग्णाकडून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न
X

तीन आमदारांच्या साहित्याची रेल्वेच्या बोगीतच चोरी होण्याची घटना ताजी असतांना आता बीड जिल्ह्यातल्या परळी रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा उघड करणारी घटना उघडकीस आलीय. परळी-अकोला ही हजारो प्रवाशांनी भरलेली रेल्वे परळी स्थानकात आली. दुपारी एकच्या सुमारास ही रेल्वे स्थानकात दाखल झाली. त्यावेळी एका मनोरूग्णानं थेट रेल्वे इंजिन असलेल्या डब्यात प्रवेश केला. प्रयत्न करूनही त्याच्याकडून रेल्वे काही सुरू झालीच नाही. दरम्यान, रेल्वेच्या मोटरमनने (चालक) प्रसंगावधान राखल्यानं हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

पुढील प्रवासासाठी जेव्हा मोटरमन इंजिन असलेल्या डब्याजवळ आला तेव्हा त्याला एक अनोळखी व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचं निदर्शनास आलं. तब्बल ४० मिनिटं तो मनोरूग्ण इंजिनमध्येच बसून होता. अर्ध्यातासानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्या मनोरूग्णाला ताब्यात घेतलं. त्या मनोरूग्णानं जेव्हा रेल्वेच्या इंजिनाचा ताबा घेतला त्यावेळी अनेकांना तो मोटरमनच असल्याचं वाटलं. तब्बल ४० मिनिटांनी तो मोटरमन नसल्याचं लक्षात आलं. रेल्वे स्थानकात रेल्वे आल्यानंतर त्याच्या सुरक्षेसंदर्भात दाखवलेल्या हलगर्जीपणासाठी रेल्वे प्रशासनानं काय कारवाई केली हे अद्याप समजू शकलेलं नाही.

Updated : 25 Jun 2019 11:10 AM GMT
Next Story
Share it
Top