Home > News Update > पाकिस्तानी नेत्याला लावलं मांजरीचं कॉमिक फिल्टर, सोशल मीडियावर ट्रोल

पाकिस्तानी नेत्याला लावलं मांजरीचं कॉमिक फिल्टर, सोशल मीडियावर ट्रोल

पाकिस्तानी नेत्याला लावलं मांजरीचं कॉमिक फिल्टर, सोशल मीडियावर ट्रोल
X

जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जगभरातील सोशल मीडियाचा भरपूर वापर करत आहेत. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक गमतीदार घटना घडलीय. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारच्या सोशल मीडिया टीमकडूनच ही गंभीर चूक घडलीय.

पीटीआय चे नेते शौकत युसूफझाई यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकार परिषद सुरू होताच युसूफझाई यांच्या चेहऱ्यावर कॅट फिल्टर (मांजरीच्या चेहऱ्याचं मास्क) दिसायला लागलं. युसूफझाई यांची अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद सुरू असतांना हा गंभीर प्रकार घडलेला आहे. या प्रकाराची काहीच माहिती नव्हती. नंतर जेव्हा युसूफझाई यांना हा प्रकार कळाला तेव्हा त्यांनी अशा चुकांना महत्त्व न देण्याची विनंती केलीय. कॉमिकल फिल्टरनं त्यांच्या चेहऱ्यावर गुलाबी कान आणि फुलं असं विचित्र लाईव्ह सर्व नेटिझन्सला पाहायला मिळालं. मी एकटाच नाही तर माझ्यासोबत बसलेले दोन अधिकारीही 'कॅट फिल्टरने' हेरले होते असंही युसूफझाई यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेनंतर काही मिनिटांनी हा व्हिडीओ काढण्यात आला.

Updated : 17 Jun 2019 3:44 PM GMT
Next Story
Share it
Top