Home > मॅक्स रिपोर्ट > जेव्हा पोलीस अधिकारी विखे पाटील, अजित पवारांना चूना लावतो

जेव्हा पोलीस अधिकारी विखे पाटील, अजित पवारांना चूना लावतो

जेव्हा पोलीस अधिकारी विखे पाटील, अजित पवारांना चूना लावतो
X

स्थळ.. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, मुबंई. वेळ - वाईटच,,,

पोलीस स्टेशनच्या दारात राज्यातले धुरंधर नेते. उदा. राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे अजित पवार, जयंत पाटील, शरद रणपिसे, जितेंद्र आव्हाड आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार... निमित्त होत शेतकऱ्याला मंत्रालयात झालेल्या मारहाणीची चौकशी करण्यासाठी आणि संबंधित शेतक-याला भेटून त्याला दिलासा देण्यासाठी गेलेले राजकीय नेते. खरं तर सदर शेतक-याला मारहाण झाली गुरूवारी संध्याकाळी आणि ही नेते मंडळी त्याला भेटायला गेली दुसऱ्या दिवशी दुपारी. असो, राजकीय उलथापालथीत शेतकरी ध्यानातून गेला असावा वगैरे.

तर दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या या नेतेमंडळींनी सदर शेतकऱ्याला भेटायचे होते. त्यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याला तशी माहिती दिली आणि भेटण्याची विनंती केली. मात्र, त्या शेतकऱ्याला कोर्टात नेल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगून या दिग्गजांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याचा फोन क्रमांक मिळवून त्याला विचारले असता तो म्हणाला साहेब मी पोलीस ठाण्यातच आहे. मला आतल्या खोलीत टाकले आहे. जयंत पाटील यांनी आत जावून पाहिले असता तो खरेच आतल्या खोलीत बंद होता. ही बाब समोर येताच अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर पोलीस अधिका-याला चांगलेच फैलावर घेतले. त्यावर तो काही बोलू शकला नाही. पण राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांना, माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री यांना हातोहात फसवण्याची ही धमक आणि फाजील हिंम्मत येतेच कशी? यामागे केवळ वर्दीचा माज असणार नाही तर कदाचित सत्ताधाऱ्यांचा आदेश असावा, असा अंदाज या लोकप्रतिनीधींनी व्यक्त केला. मात्र, अशा प्रकारे खोटी माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अधिकाऱ्यावर हक्कभंग दाखल करण्याबाबतचा विचार असल्याचे विरोधकांनी सांगितले.

Updated : 24 March 2017 1:59 PM GMT
Next Story
Share it
Top