Home > मॅक्स रिपोर्ट > कर्जमाफीचा पहिला 'लाभार्थी' भाजपवाला!

कर्जमाफीचा पहिला 'लाभार्थी' भाजपवाला!

कर्जमाफीचा पहिला लाभार्थी भाजपवाला!
X

फडणवीस सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी अशी जाहिरात करत आजपासून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू केली. प्रातिनिधिक रुपात काही शेतकऱ्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात ज्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं त्यामध्ये होते नागपूरचे प्रमोद गमे. या कार्यक्रमात गमे यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. ही कर्जमाफी कशी ऐतिहासिक आहे वगैरे सांगितले. विशेष बाब म्हणजे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरूनच ही बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर त्यांनी केलेला कौतुकाचा वर्षाव साहजिकच म्हणावा लागेल.......

https://www.youtube.com/watch?v=kKw-tzEKW70

Updated : 18 Oct 2017 12:32 PM GMT
Next Story
Share it
Top