Home > मॅक्स रिपोर्ट > इस्लामिक दहशतवाद, आयसिस आणि भारत

इस्लामिक दहशतवाद, आयसिस आणि भारत

इस्लामिक दहशतवाद, आयसिस आणि भारत
X

आयसिस, इस्लामिक स्टेट फॉर इराक एंड सिरीया. याला आपण ISIS या नावाने ओळखतो. दहशतवाद्यांनी भारतात अनेक हल्ले केले. भारताला इस्लामिक दहशतवादाचा धोका कायम होता आणि आहेच. महाराष्ट्र पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेची पाळमुळं कामयची ठेचली. पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा कणा मोडला आणि दहशतवादी हल्ले कमी झाले. सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकलाच होता. पण, आता आयसिसचं भूत पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसलयं.

जम्मू-काश्मीर खोऱ्यातून भारतात आयसिसनं जन्म घेतला. जम्मू-काश्मीरच्या तणावपूर्ण वातावरणाचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. जम्मू-काश्मीरच वातावरण कलुषीत केल्यानंतर, काश्मिरी युवकांची माथी भडकवल्यानंतर आता आयसिसने थेट देशात शिरकाव केलाय. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात आयसिसची पाळमुळं घट्ट रोवली गेलीयेत. जो शत्रू भारताच्या सीमेपासून कोसोदूर होता, तो आता थेट भारतात येवून पोहोचलाय.

मध्यप्रदेशमध्ये पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला. तपासाची चक्र फिरली तेव्हा आयसिस या दहशतवादी संघटनेकडे चौकशीची दिशा वळली. ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी मध्यप्रदेश पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं. मध्यप्रदेशात स्फोट, तर उत्तरप्रदेशात ऐन निवडणुकीच्या धामधूमीत पोलिसांनी एका युवकाचा एन्काउंटर केला. एन्काउंटर करण्यात आलेला सैफुल्ला हा आयसिसचा संशयीत दहशतवादी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात आयसिसचे दोन वेगवेगळे मॉड्यूल्स काम करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. या दहशतवाद्यांचा प्लान अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा होता अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. पण, या हल्यानंतर आयसिसचा भारताला किती मोठा धोका आहे याची माहिती मिळते.

आयसिस. शिया मुस्लिमांची ही संघटना पहिल्यादा इराकमध्ये अस्तित्वात आली. 2014 मध्ये आयसिसला दहशतवादी संघटना म्हणून बॅन करण्यात आलं. पण, आयसिसचा खरा धोका आहे तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून. इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनामध्ये भारतातून मुलं ट्रेनिंगसाठी जायची. पण, आयसिस सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुलांची माथी भडकवतेय. सीमापार जाण्याचा धोका पत्ककरण्यापेक्षा आयसिसने देशातल्या प्रमुख महानगरात त्यांचे स्लिपर-सेल तयार केलेत. हे एजंट धार्मिक कट्टरवादाच्या सहाय्याने मुलांना भडकवण्याचं काम करतायत.

मुंबई, हैद्राबाद या दोन शहरातून आयसिसकडे मुलांचा ओघ जास्त आहे. मुंबईतल्या अचानकपणे गायब झालेल्या मुलांची चौकशी आता एटीएसने सुरू केलीये. तर, आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या काही मुलांना अटकही झालीये.

आयसिस ही फक्त दहशतवादी संघटना नाही तर, धार्मिक कट्टरवादी विचार आहे. आणि हा विचार युवकांच्या मनावर बिंबवला जातोय. चार भिंतींच्या आड इंटरनेटवर मुलांची माथी भडवकवली जातायत. फक्त भारतच नाही, आयसिसचा धोका इतर देशांनाही आहे. आयसिसच्या १०० हून अधिक दहशतवाद्यांना पाकिस्तानने ठार केलं आहे. इराक, सिरीयामध्ये आयसिसच्या विचारांना विरोध होतोय. पण, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर आयसिसची विषवल्ली देशात पोहोचणं हे भारतासाठी मोठं आव्हानच म्हणावं लागेल.

केंद्रात मोदींचं सरकार आलं. युपीत भाजपने मोठा विजय मिळवला. त्यामुळे आता भारत हिंदूराष्ट्र होणार, सरकार आपल्याला मदत करणार नाही. भाजप मुसलमानांच्या विरोधी पक्ष आहे असंही मुस्लिम युवकांच्या मनात बिंबवलं जातयं. पण, युपीत मुसलमानांनीही भाजपच्या पारड्यात आपलं मत टाकलंय. आता, याला प्रोटेक्शन व्हॉट म्हणावं का आणखी काय हा प्रश्नच आहे. आयसिसचा धोका भारताला नाही असं सत्ताधाऱ्यांनी ठणकावून सांगितलं. पण, हा धोका युवकांच्या डोक्यातच राहीलेला नाही. तो आता देशात पोहोचलाय. यावरून एक स्पष्ट आहे की आयसिसचे स्लिपर सेल्स आता भारताला टार्गेट करण्यासाठी एक वेगळा प्लान नक्कीच बनवत असतील.

  • मयांक भागवत

Updated : 16 March 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top