Home > मॅक्स रिपोर्ट > आता आमदार फुटणार!

आता आमदार फुटणार!

आता आमदार फुटणार!
X

शिवसेनेने महापलिका आणि इतर स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरफुटीचं सावट निर्माण झालंय. शिवसेनेने आपला आक्रामकपणा असाच कायम ठेवला तर शिवसेना सत्तेतूनही बाहेर पडू शकेल, आणि जरशिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर मात्र राज्यातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलून जातील,अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेभरवश्याच्याकुबड्यांवर अवलंबून राहता काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील संपर्कात असलेल्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून थेट भाजपप्रवेश करवून घ्यायचा अशी भाजपची रणनिती आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सध्या विस्तव जात नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवताना दिसत नाहीत, मात्र त्याच वेळी भाजपचं वाढणं ही शिवसेनेला पचेनासं झालं आहे. ब्रँड मोदी चलतीतअसल्याने या काळात जितक्या निवडणूका येतील त्यात आक्रमकपणे आपले नंबर वाढावेत म्हणून भाजप प्रयत्न करतंय. 'शत प्रतिशत भाजपा' हीघोषणा भाजपने लपवून ठेवलेली नाही. इतर राज्यांमध्ये भाजपचा मित्रपक्षांसोबतचा व्यवहार पाहता गेली काही वर्षे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थताआहे. यंदा भाजपने शिवसेनेचा जीव ज्या पोपटात आहे त्या मुंबई महापालिकेवरच हल्ला चढवला. राज्याची सत्ता गेली तरी चालेल पण मुंबई- ठाण्यात सत्ता राहिली पाहिजे असं शिवसेनेचं धोरण आहे. त्याचमुळे मुंबईतल्या राड्यात भाजपला शरण जायचं नाही असं शिवसेनेंनं ठरवलं आहे.

हा राडा असाच वाढला तर राज्य सरकारला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सत्ता आल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकाँग्रेसमधले अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. आपापल्या आमदरकीचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचीतयारी जवळपास १० आमदारांनी दाखवली आहे. त्यामुळे सरकार अस्थिर झालं तर आपलं महत्व वाढेल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशेला सुद्धासुरूंग लागणार आहे.

Updated : 27 Jan 2017 4:48 AM GMT
Next Story
Share it
Top