Home > मॅक्स रिपोर्ट > ...आणि रामदेव बाबांचे दुकान शाळेत सुरू !

...आणि रामदेव बाबांचे दुकान शाळेत सुरू !

...आणि रामदेव बाबांचे दुकान शाळेत सुरू !
X

शाळेत नव्याने काय शिकवायचे कसे शिकवायचे याचे धडे या सरकारने दिलेच आहेत. अगदी बायोमेट्रीक हजेरी ते सेल्फी हजेरी अशी मजल मारलेल्या या सरकारने आता शाळेत रामदेव बाबाचे दुकान सुरू करण्याचा नवा फंडा शोधुन काढलाय. त्यासाठी त्यांनी जंक फुड हे आरोग्याला घातक असल्याचे सांगत आता धान्य॰कडधान्य, डाळी आणि भाज्या असलेले पौष्टीक पदार्थ खायची सक्ती केलीय. वास्तविक जंक फुड हे वाईट आहेच. मात्र, त्याऐवजी रामदेव बाबांच्या भट्टीत तयार होणारे पदार्थ कसे चांगले आहेत. हे सांगण्याचा प्रयत्नच सरकारने आपल्या शासन निर्णय़ाद्वारे केल्याचे दिसते.

जंकफुड मध्ये जीवनसत्वे व खनिजांची असणारी कमतरता आवण मीठ, साखर व मेदाचे असणारे अवतप्रमाण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा व अन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे असे अन्नपदार्थ शाळांच्या उपहारगृहात विक्रीसाठी ठेवणे व त्यांची विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. सदर प्रतिबंधित पदार्थ शाळांच्या उपहारगृहात आढळणार नाहीत, याची दक्षता सर्व मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. तसेच, शरीरास हावनकारक असणारे जंक फुडऐवजी अन्य पोषक पदाथांचे सेवन अधिकाधिक केल्याने होणारे फायदे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

शाळेतील उपहारगृहात प्रतिबंधित पदार्थ

चिप्स, तळलेले पदार्थ जसे की, बटाटयाचे चिप्स व इतर,. स्थानिक उत्पादकांनी तयार केलेले चिप्स, सरबत, बफाचा गोळा (आइस गोला) . शर्करायुक्त काबोनेटेड शीतपेय आणि नॉन काबोनेटेड शीतपेय . गोड रसगुल्ले, गुलाबजामुन, पेढा, कलाकांद . नुडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणी-पुरी (गोल गप्पे). सगळया प्रकारच्या चघळण्याच्या गोळया आणि कँडी . जे पदार्थ 30 टक्के पेक्षा जास्त शर्करायुक्त असतात जसे की, जलेबी, इमरती, बुंदी इ. सगळ्या प्रकाराची चॉकलेटस् . सगळया प्रकारची मिठाई. केक आणि बिस्कीट . बन्स आणि पेस्री ,जाम आणि जेली

शाळेतील उपहारगृहात ठेवण्यास शिफारस केलेले पदार्थ

गहूरोटी/पराठा ज्यामध्ये ऋतुनिहाय भाज्या वापरलेल्या असाव्यात एकापेक्षा जास्त धान्याची रोटी/पराठा की ज्यामध्ये ऋतुनिहाय भाज्या वापरलेल्या असाव्यात. भात, भाजी पुलाव आणि डाळ , भाजी पुलाव , भात आणि काळा चना , गव्हाचा हलवा सोबत काळा चना , गोड दलिया सोबत नमकिन दलिया भाजी,. भात आणि पांढरा चना . भात आणि राजमा . कढी भात ,बलगर गव्हू उपमा किंवा खिचडी/ हिरवे आणि डाळ कट्टू, पायसाम, पपई/टोमॅटो/ अंडी . चिंचेचा भात/ हिरवे कट्टू बरोबर डाळ/बलाहार पायासम, पपई/टोमॅटो/ हिरवे चणे . डाळभात, हिरवे आणि डाळ कट्टू,बलाहार पायासम, पपई/टोमॅटो, बेंगाल चणे . भात, सांबर . इडली, वडा, सांबर. खीर, फिरनी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की, दही, ताक, लस्सी (कमी प्रमाणात साखर) . भाज्यांचा उपमा. भाज्यांचे सॅण्डवीच. भाज्यांची खिचडी. नारळाचे पाणी, शिकंजी, जलजीरा इ पदार्थ ठेवण्यात यावेत असे फर्मान सरकारने काढले आहे.

आता काय़ खावे आणि उपहारगृहैत काय ठेवावे याबाबत सरकारने केलेल्या शिफारशी पाहता हे पदार्थ सध्या कुठे मिळतात आणि कोण बनवते याची कल्पना सहजच यावी.

Updated : 8 May 2017 4:08 PM GMT
Next Story
Share it
Top