Home > Election 2020 > मोदी म्हणतात "कुणी विश्वास ठेवणार नाही, पण मी 35 वर्ष भिक्षा मागून जगलोय"

मोदी म्हणतात "कुणी विश्वास ठेवणार नाही, पण मी 35 वर्ष भिक्षा मागून जगलोय"

मोदी म्हणतात कुणी विश्वास ठेवणार नाही, पण मी 35 वर्ष भिक्षा मागून जगलोय
X

मोदींचा जन्म 1950 चा. त्यांचे जसोदाबेनशी लग्न झाले 1968 साली. त्यांनतर कधीतरी त्यांनी घर सोडले म्हणजे साधारण 1970 च्या आसपास. मोदी लहानपणी भिक्षा मागत नव्हते कारण त्यांच्या म्हणण्यानुसार तेव्हा ते चहा विकत होते व फावल्या वेळात मगर वगैरे पकडत होते.

1970 पासून 35 वर्षे जर भिक्षा मागायची मोजली तर साधारण 2005 साल उजाडते. पण मोदी तर 1985 ला संघातून भाजपमध्ये पदाधिकारी म्हणून गेले होते आणि 2001 ला ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. मग मोदींनी भिक्षा नेमकी मागितली कधी? बर याच दरम्यान मोदी अमेरिका वगैरे परदेशवाऱ्या करत होते. भीक मागून परदेश दौरे वगैरे करता येणे हे जरा मोठंच नवल आहे.

एकंदरीत मोदी म्हणाले ते खरं आहे की मोदींनी 35 वर्षे भीक मागितली यावर कुणी विश्वास ठेवू शकत नाही. आजतकचे मुलाखत घेणारे 3 वरिष्ठ पत्रकार ही 35 वर्षांची थाप एकही प्रश्न विचारून खरी की खोटी आहे हे पडताळत नाहीत. कदाचित मुलाखत अराजकीय वगैरे असावी!

- डॉ. विनय काटे

Updated : 29 April 2019 9:11 AM GMT
Next Story
Share it
Top