भाजपचं कँपेन चुकतं तेव्हा…. !

IMG-20170129-WA0014
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये तुफान युद्ध सुरू आहे हे युद्ध सोशल मिडीयावरही पाहायला मिळतंय. व्हॉटस्अॅप वर दोन्ही बाजूंनी पोस्ट चा मारा सुरू आहे. अर्थातच भाजप यात आघाडीवर आहे. या घाई गडबडीत पक्षांकडून काही चुका ही होतात. पण ही चूक जर मुंबई महापालिकेचं नाव ही नीट लिहीता आलं नसल्याची असेल तर?
मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न बघणाऱ्या भाजपच्या डिजीटल कँपेन मध्ये गंभीर चूक झालीय. भाजपनं एक हॅशटॅग बनवलाय #BJP4BMCG खरं तर मुंबई महापालिकेला एकतर BMC म्हणतात किंवा MCGM म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई किंवा ग्रेटर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. BMCG असं कुठलंच नाव मुंबई महापालिकेला नाही. निदान मॅक्समहाराष्ट्रच्या वाचनात तरी नाहीय.
आता चर्चा अशी आहे की ज्यांना महापालिकेचं नावही नीट लिहीता येत नाही ते सत्ता काय चालवणार. अर्थात ही चूक झालीय, दुरूस्त करून घेऊ असं भाजपच्या मोहीत कंभोज यांनी सांगीतलंय, पण तो पर्यंत शिवसेनेला एक मुद्दा मात्र मिळून गेलाय.