Home > मॅक्स किसान > नाराज शेतकऱ्यांची दिल्लीत धडक

नाराज शेतकऱ्यांची दिल्लीत धडक

नाराज शेतकऱ्यांची दिल्लीत धडक
X

देशभरातल्या नाराज शेतकऱ्यांच्या घोषणांनी आज दिल्ली चांगलीच दणाणून गेली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे अांदोलन करण्यात अाले. १८० छोट्या मोठ्या राजकिय आणि अराजकिय शेतकरी संघटनांनी आज दिल्लीत रस्त्यावर उतरून एल्गार केला. देशभरातून लाखो शेतकरी दिल्लीत दाखल झालेत. या संघटनांनी एकत्र येत ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डीनेशन कमिटीची स्थापना करण्यात आली.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अाणि खासदार राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक धावले, स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव, ॲड. प्रशांत भूषण, किसान सभेचे नेते अतुलकुमार अंजान, किसान मजदूर सभेचे अध्यक्ष बी. वेंकट रमय्या, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष कोडीहल्ली चंद्रशेखर, किसान संघर्ष समितीचे नेते डॉ. सुनीलम अादी या वेळी उपस्थित होते.

उत्पादन खर्च्ाच्या वर ५० टक्क्यापर्यंत हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, आणि कर्जमुक्ती आदी मागण्यांसाठी किसान मुक्ती सेनेने रामलिला मैदान ते संसद भवन अशी रॅली केली.

सत्तेत येताना सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने भाव न देता वर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे आणखी एक खोटे आश्वासन दिले. मात्र त्यावर काहीही अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या बाजूचा एकही निर्णय झाला नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

Updated : 20 Nov 2017 11:00 AM GMT
Next Story
Share it
Top