Home > मॅक्स किसान > कर्ज न मिळाल्यानं शेतकऱ्यानं पेरले दगड

कर्ज न मिळाल्यानं शेतकऱ्यानं पेरले दगड

कर्ज न मिळाल्यानं शेतकऱ्यानं पेरले दगड
X

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करत तात्काळ दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. पण, शेतकऱ्यांच्या पदरात अजून एक रुपयही पडलेला नाही. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात बी बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात चक्क दगडाची पेरणी करून सरकारचा निषेध केलाय. खामगाव तालुक्यातील खुटपूरीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलं आहे.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात जांभोरा गावमध्ये ६० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. ताराचंद शेंदरे असं या अल्पभूधाकर शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्यावर 50 हजारांच कर्ज होतं. शुक्रवारी संध्याकाळी शेतात जाऊन त्यान स्वतःला जाळून घेतलं.

Updated : 17 Jun 2017 2:15 PM GMT
Next Story
Share it
Top