Home > मॅक्स किसान > ओएनजीसीच्या खोदकामाने परभणीत शेतकऱ्यांचे नुकसान

ओएनजीसीच्या खोदकामाने परभणीत शेतकऱ्यांचे नुकसान

ओएनजीसीच्या खोदकामाने परभणीत शेतकऱ्यांचे नुकसान
X

सध्या देशभरात विविध ठिकाणी भूगर्भ माहिती संकलानाचं काम सुरु आहे. विशेषतः गाळयुक्त अज्ञात खोऱ्यांमध्ये हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता या सर्व्हेतून तपासली जात आहे. सरकारी मालकीची ओनजीसी कंपनी हे भूगर्भ माहिती संकलनाच काम करत असून सध्या परभणी जिल्ह्यातील विविध पाथरी तालुक्यातील तरुगव्हान, कानसुर, लोणी, तुरा, जैतापूरवाडी, बांध, खेडुळा, देवेगाव, या गाळयुक्त खोऱ्यात तपासणी सुरु आहे. मात्र हे काम सुरु असताना, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान होत आहे. शेतात विविध यंत्र सामग्री, ट्रॅक्टर, बोर मशीन आणल्याने पीकांचं मोठ नुकसान झालं आहे. तुरा येथील शेतकरी कपिल जाधव यांच्या कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याने त्यांनी ओएनजीसी कंपनीचा ट्रक्टर थांबवून ठेवला. या भागातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. मात्र नुकसान भरपाईपोटी म्हणून शेतकऱ्यांना एका पाॅईंटमागे एक हजार रुपयांचा चेक ओएनजीसी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या हातावर टेकवला जातोय. तसेच चेक न स्विकारणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे. ही नुकसान भरपाई कंपनीतर्फे आहे की सरकारतर्फे हे सांगण्यास कोणीही तयार नाहीए तसेच ही शोध मोहीम केंद्र सरकारची आहे असं सांगून शेतकऱ्यांची तोंडं बंद केली जात आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे.

Updated : 5 Nov 2017 1:51 PM GMT
Next Story
Share it
Top