Home > Max Political > "तरुणांनो आत्महत्या करू नका...!" मनोज जरांगे पाटलांचं तरूणांना आवाहन

"तरुणांनो आत्महत्या करू नका...!" मनोज जरांगे पाटलांचं तरूणांना आवाहन

तरुणांनो आत्महत्या करू नका...! मनोज जरांगे पाटलांचं तरूणांना आवाहन
X

मराठा समाजासाठी राज्यव्यापी आंदोलन उभं करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात मराठा समाजाच्या संवाद बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी जरांगे पाटील म्हणाले की, तरुण हे समाजाची ताकद आहेत. आरक्षणासाठी भावनेच्या भरात येऊन आत्महत्या करू नका. तु्म्हीच जर असं टोकाचं पाऊल उचललं तर हे मिळणारे आरक्षण कुणासाठी? पण तुम्ही काळजी करू नका, मी मराठा समाजाचा ओबीसीतूनच गुलाल उधळणार आहे, असा विश्वास जरांगे पाटलांनी उपस्थित समाजबांधवांना दिला.

परभणी जिल्ह्यात मराठा तरूणांच्या संवाद बैठकीसाठी मनोज जरांगे हे शनिवारी सकाळी ११.३० वा. परभणी जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पाथरी तालुक्यातील वडी येथे समाजबांधवांशी संवाद साधला. याप्रसंगी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सोमेश्वर शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी गावात सुरू असलेल्या शिव सप्ताहाला त्यांनी भेट दिली असता उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या मुलाबाळांची काळजी मराठा समाजाने घ्यावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. परभणी जिल्ह्यात शनिवारी दुपारी १ वाजता मानवत तालुक्यातील यशवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधला. या ठिकाणी त्यांनी जागृत देवस्थान मारुतीरायाचे दर्शन घेतले. पेडगाव, आर्वी त्याचप्रमाणे आत्महत्या केलेल्या इतर गावांमधील तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला.

Updated : 21 April 2024 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top