Home > Max Political > पवारांची भेट घेणाऱ्या चाकणकर 'औरंगाबादच्या बलात्कार पीडितां'ची भेट घेणार का?

पवारांची भेट घेणाऱ्या चाकणकर 'औरंगाबादच्या बलात्कार पीडितां'ची भेट घेणार का?

पवारांची भेट घेणाऱ्या चाकणकर औरंगाबादच्या बलात्कार पीडितांची भेट घेणार का?
X

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली असून, गुरुवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. तर चाकणकर यांनी पदभार स्वीकारण्याच्या एक दिवस आधी औरंगाबादमध्ये दरोडेखोरांनी दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. पदभार स्वीकारला च्या दुसऱ्याचं दिवशी सर्वात आधी चाकणकरांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर पवारांची भेट घेणाऱ्या चाकणकर आता 'औरंगाबादच्या बलात्कार पीडितां'ची भेट घेणार का?,असा प्रश्न विचारला जात आहे.

शेत वस्तीवर राहणाऱ्या एका कुटुंबावर 7 दरोडेखोरांनी अचानक रात्री 11 वाजेच्या सुमारास हल्ला चढवला. यावेळी या नराधमांनी दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर महाराष्ट्र भरातून संताप व्यक्त केला जात असून, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडितांची भेट घेणे अपेक्षित होते. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज सर्वात आधी आपल्या पक्षाचे प्रमुख शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे विरोधकांकडून आता टीका होण्याची शक्यता आहे.

तर पवारांच्या भेटीनंतर चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की," राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज सकाळी आदरणीय साहेबांची भेट घेतली. प्रसन्न सकाळमधील साहेबांची प्रसन्न मुद्रा,देवघरातील विठुरायाच्या दर्शनाची अनुभुती देऊन गेली.आयोगाच्या कामाची संपूर्ण माहिती सांगत, आयोगाशी महिला पोलिसांशी संबधित राज्यभरातील घटनांबद्दल अनुभव सांगितले.यावेळी तुम्ही आजचा पेपर वाचला का? असे विचारत स्वतः पेपर घेऊन मला वाचायला दिला. मला त्या पेपरवरील लेख पाहून सुखद धक्काच बसला."आक्रमक चेहरा" या शीर्षकाखाली माझ्याविषयीचा तो लेख होता.यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून करावयाच्या कामांबद्दल सल्ला व मार्गदर्शन साहेबांकडून मिळाले. साहेबांच्या समृद्ध विचारांच्या व अनुभवाच्या विद्यापीठातील विद्यार्थीनी असल्याचा कायमच गर्व वाटतो,असं चाकणकर म्हणाल्या.चित्रा वाघ यांची घटनास्थळी भेट

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांकडून तपासाबाबत आणि झालेल्या घटनेची माहिती घेतली. याचवेळी त्यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचं प्रयत्न केला.तसेच महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात महिला सुरक्षा हा विषय आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करत टीका केली.


औरंगाबादच्या घटनेवर चाकणकरांच ट्विट...

औरंगाबादच्या घटनेवर चाकणकर यांनी बुधवारी ट्विट करत म्हटलं होते की," औरंगाबाद जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटनासमोर आली आहे. पोलीस उपअधीक्षक विशाल नेहूल यांच्याशी माझं आत्ताच बोलणं झालं असून आरोपीना पकडण्यासाठी तातडीने पथकं तयार करून तपास चालू केलं असल्याचं त्यांनी सांगितलं असल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं.

Updated : 2021-10-22T14:59:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top