Home > Max Political > भाजपच्या जाहीरनाम्यात लाएंगे, करेंगे म्हटलंय..मग १० वर्षात काय केलं? - जितेंद्र आव्हाड

भाजपच्या जाहीरनाम्यात लाएंगे, करेंगे म्हटलंय..मग १० वर्षात काय केलं? - जितेंद्र आव्हाड

भाजपच्या जाहीरनाम्यात लाएंगे, करेंगे म्हटलंय..मग १० वर्षात काय केलं? - जितेंद्र आव्हाड
X

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीक केली आहे. ते म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे असं म्हटलंय. मग मागच्या दहा वर्षांत भाजपने काय केलं? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याची तुलना करत भाजपवर सडकून टीका केली आहे.

यासंदर्भात ट्वीट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील तुलना करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मल्लिकार्जून खरगे आणि यांची मोजून चार छायाचित्रे आहेत. तर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे असं म्हटलंय. मग गेली दहा वर्षे काय केलं? असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Updated : 15 April 2024 6:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top