Home > Max Political > राज ठाकरे यांच्या नातवाबद्दल वक्तव्य, सचिन सावंत ट्रोल

राज ठाकरे यांच्या नातवाबद्दल वक्तव्य, सचिन सावंत ट्रोल

सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतांमुळे किंवा आपल्या भुमिकांमुळे अनेक प्रतिष्ठीत लोकांना ट्रोल केले जाते. त्यातच काँग्रेस नेते सचिन सावंत सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. पण नेमकं असं कोणतं कारण आहे ज्यामुळे सचिन सावंत ट्रोल होत आहेत.

राज ठाकरे यांच्या नातवाबद्दल वक्तव्य,  सचिन सावंत ट्रोल
X

राज्याच्या राजकारणाची पातळी ढासळत चालली असल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे. त्यातच सोशल मीडियामुळे राजकीय व्यक्तींच्या अगदी खासगी बाबींपासून ते त्यांनी घेतलेल्या भुमिकांमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. त्यातच राज ठाकरे यांच्या नातवाच्या नावावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट केल्यानंतर ट्रोलर्सने सचिन सावंत यांना प्रचंड ट्रोल केले आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचा नामकरण सोहळा आज झाला. त्यात त्या लहान मुलाचे नाव किआन असे ठेवण्यात आले. तर या नावावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यातच सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्या नातवाच्या नावावरून एक ट्वीट केले. त्यामुळे सचिन सावंत ट्रोल होत आहेत.

सचिन सावंत यांनी ट्वीट करून छोट्या गोड किआन ठाकरे ला खूप खूप आशिर्वाद! "किआन" हे नाव ही फार छान! गुगल या नावाचे मूळ पर्शियन/ हिब्रू दाखवत आहे. मराठी भाषा तशीही अनेक भाषांतील शब्दांनी समृद्ध झाली आहे. सर्वसमावेशकता हे या भाषेचे अंगच नाही का? असे म्हटले आहे.

सचिन सावंतांना ट्रोल करण्यात आलयं. कारण अनेकांनी किआन हे संस्कृत नाव असल्याचं म्हटलयं. तर काही हे विष्णुचं नावं असल्याचा दावा केला आहे.

अरे येड्या.. जरा व्यवस्थित सर्च करतं जा की.. मेंदूत द्वेष भरलाय तुमच्या. असं ट्विटर युजर किरण या ट्विटर युजरनं म्हणत ट्विट केलं आहे.

जनाब देवा या ट्विटर वापरकर्त्यानं प्रत्येक धर्मात वेगवेगळे अर्थ , मुस्लिम ख्रिश्चन नाव पण आहेच kiaan. येड्या मंदा असं म्हटलयं.

जान्हवी बोबडे यांनी सचिन सावंत यांच्या ट्वीटवर प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हटले आहे की, तुमचं ट्वीट वाचताना सर्वप्रथम मनामध्ये प्रश्न आला की तुमच्या वयाचा मान राखावा की न राखावा ? पण शेवटी संस्कार असल्याने एकच बोलेन मी आजपर्यंत ट्वीटर वर वाचलेल सर्वांत गलिच्छ विचारांच ट्वीट तुमचं आहे. अहो राजकारणासाठी इतरही मुद्दे आहेत ते बाळ अजून पाळण्यात आहे हो !,

मराठी बाणा या ट्वीटर अकाऊंटवरून सचिन सावंत यांना ट्रोल करताना 1-2 महिन्याच्या बाळाला सुध्दा यात ओढले जात असल्याने राजकारणाची पातळी घसरली असल्याच्या आशयाचे ट्वीट केले आहे.

डोक्यावरचे केस जातात ठिक आहे पण डोक्याच्या आतला मेंदू पण जाऊ शकतो हे आज कळलं, अशी टीका अमित शिंदे या ट्वीटर अकाऊंटवरून केली आहे.

Updated : 6 May 2022 5:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top