Home > Max Political > आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलं? संजय राऊत यांनी सांगितले कारण

आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलं? संजय राऊत यांनी सांगितले कारण

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकराण तापलं आहे. त्यातच भाजपकडून राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल ट्रायडंटमध्ये ठेवण्यात आले आहे. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी उत्तर दिले.

आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलं? संजय राऊत यांनी सांगितले कारण
X

राज्यसभेच्या सहावी जागा आम्हीच जिंकणार असा दावा शिवसेना आणि भाजपकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी या निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अपक्ष आमदारांनी घोडेबाजार शब्दावर आक्षेप दर्शवला होता. मात्र त्यानंतर शिवसेनेने आमदारांना हॉटेल ट्रायडंटमध्ये ठेवले आहे. त्यावरून संजय राऊत यांना मुंबईत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, "राज्यसभेसाठीची मतदानप्रक्रिया तांत्रिक असते. आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं. महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा आहे. त्यामुळे आमदारांना ऐनवेळी मतदानाला पोहचता यावं म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. आमदारांना अशा प्रकारे भाजपाने, काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीनेही एकत्र केलं आहे. त्यामुळे थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं काय आहे? तुम्ही केलेलं चालतं? तुमचं गेट-टुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो. मूर्ख लोक आहेत, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

छोट्या देशांकडून मोठ्या देशाकडे पहिल्यांदाच माफीची मागणी

गेल्या दोन दिवसांपासून देशभरात नुपूर शर्मा हे नाव चर्चेत आलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांना पक्षानं निलंबित केलं आहे. या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील इस्लामिक राष्ट्रांकडून निषेधाचा सूर उमटत असताना देशांतर्गत राजकारणात विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. या मुदद्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी भाजपावर धर्माचं राजकारण अंगलट आल्याचा देखील आरोप केला आहे.

नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. "जगभरात जे वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली आहे. सगळे देश भारतावर टीका करत नाहीत. पण त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्यांदाच एखाद्या लहान देशाकडून मोठ्या देशाकडे माफी मागण्याचा आग्रह होत आहे, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली.

Updated : 7 Jun 2022 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top