Home > Max Political > महाराष्ट्राची आज सर्वोच्च सुनावणी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी का महत्त्वाची आहे?

महाराष्ट्राची आज सर्वोच्च सुनावणी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी का महत्त्वाची आहे?

महाराष्ट्राची आज सर्वोच्च सुनावणी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी का महत्त्वाची आहे?
X

राज्यात जरी सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं असलं तरी सरकार सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत अस्थिरच म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत शिंदे गटाचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या कारवाईला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्याचा असेल नाहीतर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणत्याही गटाला न देता निकाल लागत नाही तोपर्यंत गोठवण्यात यावं अशी मागणी शिंदे गट करू शकतो.

न्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपुर्ण सुनावणी पार पडणार आहे.

1. न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड

2.न्यायमूर्तीं एम आर शहा

3.न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी

4.न्यायमूर्तीं हिमाकोहली

5. न्यायमूर्तीं पी नरसिंहा

या पाच न्यायमुर्तींच हे खंडपीठ असणार आहे.

७ सप्टेंबर सुनावणीत काय घडलं होतं…

जोपर्यंत चिन्हाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी त्यावेळीही शिंदे गटाकडून करण्यात आली होती.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेऊ शकतो की नाही हे न्यायालयाने त्या दिवशी दोन्ही पक्षांना सांगितले होते.

कारण एन व्ही रमण्णा यांच्या खंडपीठाने राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्याच्या आदेशाच्या विरोधात निर्णय दिला नव्हता.

निवडणूक आयोग देखील एक स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतं का? निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतील निर्णयावर सर्वोच्च न्यायालय बंधन आणू शकतं का?

गेल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठ होतं आणि आता घटनापीठ आहे. त्यामुळं घटनापीठ काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचे आहे…

सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे ही सुनावणी सुरू आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाने हे प्रकरण सोपवतावा कोणत्या मुद्द्यांचा विचार केला होता… हे थोडक्यात जाणून घेणं महत्त्वाचे आहे…

1. स्पीकरच्या विरोधात अविश्वास नोटीस दाखल केली असेल तर उपाध्यक्षांना आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार राहतो का ? नेबम रेबिया जजमेंट नुसार.

2. अपात्रता प्रलंबित असताना विधानमंडळातील कामकाज वैध आहे का ? त्याचं काय स्टेट्स आहे.

3. जर स्पीकरने अपात्र घोषित केले तर ज्या दिवशी आमदारांनी शिस्तभंग कारवाई केली त्या दिवशी लागू होते की ज्या दिवशी अपात्र केले त्या दिवसापासून.

4. अध्यक्षाला नेता / व्हीप ठरवण्याचा अधिकार आहे का ? याचा १० व्या अनुसूचीवर पक्षांतर बंदी कायद्यावर काय परिणाम होतो का ?

5. पक्षाच्या अंतर्गत निर्णय यात न्यायालयाने लक्ष घातले पाहीजे का ?

6. राज्यपालाचे एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास आमंत्रित करण्याचे काय अधिकार आहेत. असे अधिकार चॅलेंज करता येतात का ?

7. Split च्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र किती मोठे आहे.

Updated : 27 Sep 2022 3:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top