Home > Max Political > Bharat Jodo Yatra : जो पर्यंत कारवा चालतोय तोपर्यंत चालत राहु- आदित्य ठाकरे

Bharat Jodo Yatra : जो पर्यंत कारवा चालतोय तोपर्यंत चालत राहु- आदित्य ठाकरे

भारत जोडो यात्रेत शिवनेना नेते आदित्या ठाकरे सहभागी झाले. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले आहेत.

Bharat Jodo Yatra : जो पर्यंत कारवा चालतोय तोपर्यंत चालत राहु- आदित्य ठाकरे
X

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगाली जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले होते. ते राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत चालले. त्यानंतर माध्यमांनी आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आम्ही सगळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं वक्तव्य केलं.

सध्या पाहायाला गेलं तर आपल्या लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे. कालच संजय राऊत यांची कोर्टाचा आदेश वाचला. यामध्ये न्यायाधीशांनी देखील हेच सांगितलं होतं की बेकायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

"दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष देशासाठी, लोकांसाठी, संविधानासाठी, एकत्र आले तर त्यात चुकीचे काय आहे". असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. "तसेच महाराष्ट्रात आज जे काय घडतंय त्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, हे एकत्र येत आहेत. आम्ही सगळे लोक लंबे रेस के घोडे है! जो पर्यंत कारवा चालता राहील तो पर्यंत आम्ही चालत राहू.राहुल गांधी यांच्या यात्रेत काल राष्ट्रवादी सोबत होती. आज शिवसेना सोबत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यापुर्वी काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. आज आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Updated : 12 Nov 2022 9:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top