Home > Max Political > #गावगाड्याचे इलेक्शन : एकनाथ खडसेंच्या कोथळीत भाजप की राष्ट्रवादी? सत्ता संभ्रम

#गावगाड्याचे इलेक्शन : एकनाथ खडसेंच्या कोथळीत भाजप की राष्ट्रवादी? सत्ता संभ्रम

ग्रामपंचायत निव़डणुकीच्या निकालांमध्ये काही ठिकाणी समसमान सदस्य निवडून आल्याने सरपंच कुणाचा होणार अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसेंच्या कोथळी गावात मात्र वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.

#गावगाड्याचे इलेक्शन : एकनाथ खडसेंच्या कोथळीत भाजप की राष्ट्रवादी? सत्ता संभ्रम
X

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या पॅनलला हरवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र असलेले पॅनल म्हणजेच खडसे परिवाराला मानणारे सदस्य निवडून आले आहेत. यात भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या समर्थकांचा समावेश आहे. आता खडसे परिवाराला मानणारा सरपंच होईल पण भाजप की राष्ट्रवादी यापैकी कोणते लेबल लागेल याबाबत संभ्रम कायम आहे. एकनाथ खडसेंची सून आणि कन्या यांच्यात मात्र आता यावरुन सुप्त संघर्ष दिसतो आहे. या नणंद - भावजाई यांना आपल्याच विचारांचा सरपंच इथे असावा असं मनापासून वाटतंय, म्हणून त्या दोघांनीही आपापले दावे केले आहेत.

ज्यांच्याकडे कोथळी त्यांच्याकडेच मुक्ताईनगरची सत्ता

गेल्या तीस वर्षांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असतांना कोथळी ग्रामपंचायतीवर त्यांचीच सत्ता होती. ह्याच गावातून एकनाथ खडसेंनी राजकीय कारकीर्द सुरू केली आणि मग ते आमदार झाले आणि मंत्रीही झाले. त्यांच्यानंतर सून रक्षा खडसे ह्या कोथळीच्या सरपंच झाल्या आणि नंतर दोनवेळा खासदारही झाल्या. मात्र गेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला सरपंच कोथळीत बसवला आणि विधानसभेत शिवसेनेचे चंद्रकांत पाटील निवडून आले. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या. यामुळे कोथळीची सत्ता ज्याच्याकडे त्याच्याकडे मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघाचं नेतृत्व असे सध्या तरी दिसते आहे.

खासदार रक्षा खडसेंचे म्हणणे काय?

"बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे पहिल्यांदा गावातील निवडणूक माझ्यासाठी महत्वाची होती. भाजपने चांगली कामगिरी केली. शिवसेनेला हरवण्यासाठी चांगले प्रयत्न केले. खडसे परिवाराला मानणारा सरपंच होईल."

रोहिणी खडसेंचे म्हणणे काय?

एकनाथ खडसें पाठोपाठ राष्ट्रवादीची वाट धरणाऱ्या कन्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय की, "राष्ट्रवादीने चांगली मेहनत केली आहे. कोथळी गावात नाथाभाऊंना मानणारा गट निवडून आला आहे. परिवाराला मानणाराच सरपंच होईल".

Updated : 18 Jan 2021 10:54 AM GMT
Next Story
Share it
Top