Home > Max Political > "चंद्रयान-३" या मोहिमेची धुरा यशस्वीपणे संभाळणारी " ती" महिला कोण

"चंद्रयान-३" या मोहिमेची धुरा यशस्वीपणे संभाळणारी " ती" महिला कोण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिम-3 याचे 14 जुलै रोजी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्याने उड्डाण केले असून 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ते उतरू शकते.

चंद्रयान-३ या मोहिमेची धुरा यशस्वीपणे संभाळणारी  ती महिला कोण
X

काल १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथुन चांद्रयान ३ चे प्रक्षेपण झाले .चांद्रयान - ३ यशस्वीरित्या चंद्राकडे झेपावलं. त्यामुळे भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस म्हणून मानला गेला. सर्व वैज्ञानिकांच्या मेहनतीला यश प्राप्त झाले. या मोहिमेत पुरुषांसह महिलांचा देखील समावेश होता. परंतु या मिशन मध्ये एका महिलेवर विशेष जवाबदारी सोपवण्यात आली. जिने चंद्रयान २ या मिशन मध्ये योग्य पद्धतीने काम केले होते. त्याच रितू करिधाल यांच्यावर चंद्रयान ३ ची जवाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु या रितू करिधल कोण आहेत हे माहीत आहे का ?

आज आपण याविषयी जाणुन घेऊ

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिम-3 याचे 14 जुलै रोजी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्याने उड्डाण केले असून 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ते उतरू शकते. चंद्रावर चांद्रयान उतरवण्याच्या या मोहिमेची जबाबदारी रितू करिधाल सांभाळत आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील रितू करिधाल, "भारताची रॉकेट वुमन" म्हणून त्यांची ओळख आहे. अंतराळ क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता, इस्रोने रितू यांना चांद्रयान-3 चे मिशन डायरेक्टर बनवले आहे. याआधी त्या चांद्रयान-2 सह अनेक मोठ्या अंतराळ मोहिमांचा भाग राहिल्या आहेत, विशेष म्हणजे रितू करिधाल या त्या वैज्ञानिकांपैकी एक आहे ज्यांना इस्रोचा यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला आहे.

रितू करिधाल या मूळच्या लखनौच्या असून, त्यांचे निवासस्थान राजाजीपुरम येथे आहे. रितू यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौ येथील सेंट अग्नीज स्कूलमध्ये केले. यानंतर त्यांनी नवयुग कन्या विद्यालयातून शिक्षण घेतले. लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी केल्यानंतर, रितू एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमटेक करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोरमध्ये गेल्या.

एमटेक केल्यानंतर, रितू करिधालने पीएचडी करण्यास सुरुवात केली आणि एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली. दरम्यान 1997 मध्ये, स्टारसनच्या अहवालानुसार, त्यांनी इस्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. तिथे त्यांची नियुक्ती झाली. अडचण अशी होती या नोकरीसाठी त्यांना पीएचडी सोडावी लागणार होती. ज्यासाठी त्या तयार नव्हत्या. प्रोफेसर मनीषा गुप्ता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पीएचडी करत होत्या, त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी रितूला इस्रोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

मंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली

रितू करिधल यांची पहिली पोस्टिंग यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये झाली. येथील त्यांच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. 2007 मध्ये त्यांना इस्रो यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला होता. हा तो काळ होता जेव्हा मंगळयान मोहिमेचे काम सुरू होणार होते.एका मुलाखतीत रितू करिधलने सांगितले होते की, 'अचानक मला सांगण्यात आले की मी आता मंगळयान मोहिमेचा एक भाग आहे, हे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण उत्साहवर्धकही होते, कारण मी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग बनले होते.

रितू करिधल या चांद्रयान-२ च्या मिशन डायरेक्टर होत्या. त्यांचा अनुभव पाहता 2020 मध्येच इस्रोने ठरवले होते की चांद्रयान-3 ची मोहीमही रितूच्या हातात असेल. या मिशनचे प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल आहेत. याशिवाय चांद्रयान-2 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर एम वनिता यांना या मिशनमध्ये डेप्युटी डायरेक्टरची जबाबदारी देण्यात आली आहे, जे पेलोड, डेटा मॅनेजमेंटचे काम सांभाळत आहेत.

एक स्त्री म्हणुन भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कल्पना चावला यांनी आपलं नाव पहिली महिला अंतराळवीर म्हणुन कोरलं होतंच आणि आता रितु करिधाल यांनी रॉकेट वुमन म्हणुन आपले नाव कोरले. त्यामुळे एक स्त्री काय करु शकते हे आज रितु करिधल यांनी पुन्हा एकदा दाखवुन दिलं.

Updated : 15 July 2023 8:01 PM IST
Next Story
Share it
Top