Home > Max Political > पहिल्यांदाच आमदार आणि 4 थ्या वर्षी मुख्यमंत्री, गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर निवड झालेले भूपेंद्र पटेल कोण आहेत?

पहिल्यांदाच आमदार आणि 4 थ्या वर्षी मुख्यमंत्री, गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर निवड झालेले भूपेंद्र पटेल कोण आहेत?

पहिल्यांदाच आमदार आणि 4 थ्या वर्षी मुख्यमंत्री, गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर निवड झालेले भूपेंद्र पटेल कोण आहेत?
X

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक नेत्यांची नाव चर्चेत असताना मुख्यमंत्री पदाची माळ भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात पडली आहे. भूपेंद्र पटेल हे पाटिदार समाजातील कावडा या जातीतुन येतात. त्यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेले आहे. ते पहिल्यांदाच 2017 मध्ये आमदार झाले होते.

या पदासाठी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह महाराष्ट्रीयन असलेले चंद्रकांत पाटील यांचं नाव मुख्यमंत्र्यांची शर्यतीत होतं.

कोण आहेत भूपेंद्र पटेल? (Who is Bhupendra Patel?)

भुपेंद्र पटेल यांनी सिव्हिल इंजिनिअरींग ची पदवी मिळवली आहे..

भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद सांभाळलेले आहे.

आनंदीबेन पटेल यांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या घाटलोदिया मतदार संघातून ते 2017 मध्ये विधानसभेवर निवडून आले. ते आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे मानले जातात. ते

विजय रुपाणी यांचा राजीनामा

दरम्यान राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन विजय रुपाणी यांनी आपला राजीनामा सोपवला होता. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभार मानले होते. रुपाणी यांच्या रुपाने गेल्या काही दिवसात भाजपच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांचा असा तडकाफडकी राजीनामा झाला.

यामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा येडियुरप्पा यांनी असाच राजीनामा दिला होता. तर त्याआधी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावरुन तिरथ सिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

दरम्यान विजय रुपाणी यांनी भाजपमध्ये पदभार बदल असतो ही प्रक्रिया आहे. नवीन नेत्वृत्वाखाली विकास यात्रा सुरूच राहिल, असे विजय रुपाणी यांनी सांगितले आहे. आपण पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडून असेही रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे. आपण विकासकाम केली तर मग राजीनामा का द्यावा लागला, असा सवाल पत्रकारांनी विचारला, तेव्हा विजय रुपाणी यांनी पक्षाबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. तसेच पक्ष हा सर्वोच्च आहे, गुजरातच्या विकासाचे काम आधीही सुरू होते आणि यापुढेही तसेच सुरू राहील असेही रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे.

गुजरात विधानसभेची निवडणुक पुढच्या वर्षात होणार आहे. त्याच्या १ वर्ष आधी रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळं नव्याने मुख्यमंत्री झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

Updated : 2021-09-12T19:52:54+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top