Home > Max Political > ठाकरे सरकारच्या रडारवरील भाजपचे टॉप १० नेते कोण?

ठाकरे सरकारच्या रडारवरील भाजपचे टॉप १० नेते कोण?

महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री सध्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. आणखीही काही मंत्री तुरुंगात जातील असा इशारा भाजप नेते देत आहेत. पण या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारनेही भाजपच्या अनेक नेत्यांभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. हे टॉप १० नेते कोण आहेत, त्यावर एक नजर टाकूया....

ठाकरे सरकारच्या रडारवरील भाजपचे टॉप १० नेते कोण?
X

महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष आता गंभीर वळणावर आहे. महाविकास आघाडीचे दोन मंत्री सध्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. आणखीही काही मंत्री तुरुंगात जातील असा इशारा भाजप नेते देत आहेत. पण या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारनेही भाजपच्या अनेक नेत्यांभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात होताच विरोधकांनी पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. सभागृहात आणि सभागृहाबाहेर घोषणाबाजी, वेगवेगळे आरोप करत सरकारची कोंडी केली गेली. पण नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही, या भूमिकेवर ठाकरे सरकार ठाम आहे. त्यातच आता ठाकरे सरकारने आले अंगावर तर घेईन शिंगावर अशी भूमिका घेत आता भाजपच्या बड्या नेत्यांभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. हे नेते कोण कोण आहेत, त्यावर एक नजर टाकूया...

नंबर १० – माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळातील महावितरणच्या कामांची चौकशी कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





नंबर – ९ – देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार प्रसाद लाड यांच्यावरही मुंबई महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी टांगती तलवार कायम आहे.





नंबर ८ – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी नुकताच पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. दाऊद इब्राहिमशी शरद पवार यांचे संबंध असल्याचा आरोप केल्याने, त्यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




नंबर – ७ संतोष परब हल्ला प्रकरण, दिशा सालियानची मृत्यूपश्चात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सध्या नितेश राणे जामिनावर बाहेर आहेत.





नंबर – ६ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तर मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले म्हणून अटक झाली होती. याप्रकरणात ते जामिनावर बाहेर आहेत. तसेच दिशा सालियान बदनामी प्रकरणीही नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.




नंबर – ५ देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक खास सहकारी गिरीश महाजन यांच्याविरोधात २०१८ मधील प्रकरणात नव्याने कारवाईचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचसंदर्भातला पेनड्राईव्ह बॉम्ब फडणवीस यांनी नुकताच विधानसभेत सादर केला.





नंबर – ४ भाजपचे आमदार आशिष शेलार...वर्षभरासाठीचे निलंबन रद्द झाल्यानंतर आशिष शेलार आता पुन्हा आक्रमक झाले आहेत. पण त्यांच्याविरुद्ध मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.





नंबर – ३ यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत विधान परिषदेतल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर....मुंबई सहकारी बँकेतील मजूर प्रकरणात आता दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.





नंबर – २ ठाकरे सरकारच्या रडारवरील यादीत किरीट सोमय्या यांचेही नाव प्राधान्याने दिसते. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींशी आर्थिक संबंधांचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आता याप्रकरणात मुंबई पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे.




नंबर -१ ठाकरे सरकारला विधिमंडळात वारंवार अडचणीत आणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सरकारने इशारा दिला आहे. फोन टॅपिंग प्रकऱणात फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला असला तरी यापुढे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.




महाविकास आघाडीनेही आता आक्रमक भूमिका घेतली असली तरी येत्या काळात भाजपच्या नेत्यांविरोधातील कारवाईचा वेग कसा राहतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 18 March 2022 1:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top