Home > Max Political > कितीही खोदलात तरी जिकडे तिकडे बुद्धच सापडतील : भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद

कितीही खोदलात तरी जिकडे तिकडे बुद्धच सापडतील : भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद

ज्ञानव्यापी मशीदीवरून देशात सुरू असलेल्या वादात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनीही उडी घेतली असून देशात कुठेही कितीही खोदा ,जिकडे तिकडे तुम्हाला बुद्धच सापडेल ; जर भाजपाने हे वेळीच थांबवलं नाही तर आम्ही प्राचीन भारताचा आमचा वारसा सांगत आम्ही न्यायालयात जाऊ असा सज्जड दम चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारला दिलाय.

कितीही खोदलात तरी जिकडे तिकडे बुद्धच सापडतील : भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद
X

ज्ञानव्यापी मशीदीवरून देशात सुरू असलेल्या वादात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनीही उडी घेतली असून देशात कुठेही कितीही खोदा ,जिकडे तिकडे तुम्हाला बुद्धच सापडेल ; जर भाजपाने हे वेळीच थांबवलं नाही तर आम्ही प्राचीन भारताचा आमचा वारसा सांगत आम्ही न्यायालयात जाऊ असा सज्जड दम चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारला दिलाय.

सम्राट अशोकांनी या देशात ८४ हजार बौद्ध स्तूप बांधले होते, ते कुठे आहेत ,याच जमिनीत आहेत ,इथली सगळी मंदिरे त्याच स्तूपवर उभी आहेत ,त्यामुळे कितीही खोदलात तरीही बुद्ध विहारच सापडेल , तिरुपती येथील मंदीर असो, अथवा छत्तीसगडमधील शिरधामपूर असो या मंदिराच्या मुळाशी बौद्ध विहारच आहेत , हा वारसा सांगण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ शकतो , भाजपाने हे थांबवलं नाही , तर आम्ही आमचा वारसा सांगू शकतो , देशात प्रत्येक ठिकाणी बुद्ध वारसा मिळेल असे मत चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केलं आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या राजकारण भीम आर्मी प्रवेश करणार आहे. विचारावर आधारीत आमचं राजकारण असल्यानं पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात नक्कीच विजय मिळेल असाही विश्वास चंद्रशेखर आझाद यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags;

Updated : 30 May 2022 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top