Home > Max Political > Karnataka Election | कर्नाटकात मुस्लीमांनी काँग्रेसला जिंकवलं का?

Karnataka Election | कर्नाटकात मुस्लीमांनी काँग्रेसला जिंकवलं का?

कर्नाटक निवडणूकीत भाजपचा पराभव मुस्लिम समुदायाने केला आहे का ? या निवडणूकीत भाजपाचा पराभव झाला आहे की मोदी आणि शहांचा. धार्मिक ध्रुवीकरणाचा डावपेच भाजपावरच उलटलाय का ? वाचा जेष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सलीम खान यांचे सडेतोड विश्लेषण.

Karnataka Election | कर्नाटकात मुस्लीमांनी काँग्रेसला जिंकवलं का?
X

मुस्लीम समाजाच्या बाबतीत एक तथ्य आहे. हे तथ्य संपूर्ण जगाला माहित आहे की, मुस्लीम समुदाय हा भाजपाच्या विरोधातील एक मोठा समुदाय आहे. काहीही झालं तर एखादा नेता फुटेल पण समुदाय मात्र भाजपाकडे कधीही जात नाही. याची वेगवेगळी कारणे आहेत.

ही गोष्ट खरी आहे की कर्नाटक येथील कॉंग्रेसचा विजय हा केवळ मुस्लिमांमुळे झालेला नाही. कोणताही समुदाय असा दावा करू शकत नाही की हा विजय लिंगायत समूहाच्यामुळे आहे , हा विजय दलित समुदायामुळे आहे. जेंव्हा हे समुदाय एकत्र येतात ते विजयाचं खरं कारण बनतं. मुस्लीम समुदायाविषयी बोलायचं झालं तर २०११ मध्ये जी जनगणना झाली होती. त्यानंतर अजून जनगणनाच झालेली नाही. त्या जणगणनेनुसार मुस्लीम लोकसंख्या १२.९ टक्के इतकी आहे. काही प्रदेश असा आहे की जिथे मुस्लिमांची संख्या एकवटलेली आहे. बिदर आणि गुलबर्गा येथे 20 टक्के मुस्लीम राहतात. विजापूर मध्ये १७ टक्के मुस्लीम राहतात. धारवाड येथे २१ टक्के मुस्लीम राहतात.

हवेलीत 19 टक्के, कोडा आणि परिसरात १६ टक्के अशी मुस्लीम लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. एकूण २२४ मतदारसंघांपैकी ६५ मतदारसंघांवर मुस्लीम समुदायाचा प्रभाव आहे. या ६५ मतदारसंघातील ३२ ते ३३ जागा कॉंग्रेसने जिंकलेल्या आहेत. या अर्थ सरळ आहे की ज्या भागातील मतदारसंघावर मुस्लीम समुदायाचा प्रभाव आहे तेथे कॉंग्रेसला मोठे यश मिळाले आहे. म्हणजे कॉंग्रेसच्या विजयात मुस्लीम समुदायाचे मोठे योगदान आहे. आपण जर प्रदेशानुसार पाहिले तर कोस्टल कर्नाटक असा विभाग आहे जेथे भाजपाला १४ तर कॉंग्रेसला सहा आणि जे डी एस ला एक जागा मिळाली आहे. याशिवाय संपूर्ण कर्नाटक राज्यात प्रत्येक ठिकाणी कॉंग्रेस ने भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. परंतु आपण मुस्लिमांची संख्या लक्षणीय असलेल्या हैदराबाद कर्नाटकचा जो भाग आहे जो पूर्वी निजामासोबत होता. तेथे कॉंग्रेसला १६ आणि भाजपाला १० जागा मिळाल्या आहेत.

याचप्रमाणे कर्नाटक भागात पाहिलं तर कॉंग्रेसला २१ तर भाजपाला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ हा होतो की मुस्लीम समुदायाचे मतदान कॉंग्रेसला अनुकूल झालेलं आहे. शहरात भाजपा मजबूत समजली जाते परंतु बेगालुरू मध्ये कॉंग्रेसला १७ तर भाजपाला केवळ १४ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये मुस्लिमांचा काही ना काही वाटा आहे. जुना म्हैसूर भाग जेडीएस चा गड मानला जात होता. त्या भागात कॉंग्रेसने ३७ जागा मिळवल्या आहेत. येथे बीजेपीला केवळ सहा जागा मिळाल्या तर जेडीएस ची संख्या घटून केवळ १४ इतकी राहिली आहे.

मुस्लीम समुदायाने या विजयात मोठी जबाबदारी उचलली. मुस्लीम समुदायाची लोकसंख्या देखील जास्त आहे. परंतु मुस्लीम उमेदवाराला मिळालेल्या तिकीटाची संख्या कमी आहे. कॉंग्रेसने १५ मुस्लिमांना तिकीट दिली. त्यातील ९ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत जेडीएस ने २२ मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली होती. या सर्वच्या सर्व उमेदवारांची हार झाली आहे. मुस्लीम उमेदवारांची तुलना गत निवडणुकीशी केली तर गेल्या वेळी सात मुस्लीम जिंकले होते. याची संख्या यावेळी ९ झाली आहे. त्यावेळी कॉंग्रेसने सातारा मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले होते. जेडीएस ने त्यावेळी आठ मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले होते.

यावेळी २२ मुस्लीम उमेदवार देऊन देखील हे उमेदवार जिंकलेले नाहीत. याचा अर्थ जेडीएसपासून मुस्लीम समुदायाचा अपेक्षाभंग झाला आहे. पूर्वी मोठ्या संख्येने मुस्लीम समुदाय देवीगौडा यांच्या सोबत होता. त्यांचा मुलगा कुमार स्वामी यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. ते मुख्यमंत्री देखील झाले. भाजपा त्यांना साथ देत होती. यामुळेच मुस्लीम मतदार जेडीएस पासून दूर जाऊ लागला. परंतु हलाल च्या मुद्द्यावर जेडीएस ने मुस्लिमाची बाजू घेतली होती.

परंतु यावेळी जेडीएस भाजपासोबत जाऊन सरकार बनऊ शकते या अंदाजाने मुस्लीम समुदायाने मोठ्या संख्येने कॉंग्रेसला मतदान केले. दक्षिनेत मुस्लिमांची संख्या मोठी आहे. जुना म्हैसूरु मध्ये एकूण ४६ जागा आहेत. त्यापैकी कॉंग्रेसने २९ जागा मिळवल्या आहेत ज्या पूर्वी केवळ ११ होत्या. जेडीएस कडे या ठिकाणी २५ जागा होत्या त्या घटून आता केवळ ११ झाल्या आहेत. भाजपा ९ वरून केवळ ५ वर आली आहे.

बॉम्बे कर्नाटकचा विचार केल्यास या ठिकाणी कॉंग्रेसने पूर्वी १६ जागा मिळवल्या होत्या आता त्या ३३ झाल्या आहेत. भाजपाने पूर्वी ३० जागा जिंकल्या होत्या त्याची संख्या आता १६ वर आली आहे. याची कारणे भाजपाने सीमावादावर घेतलेल्या भूमिका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमाभागातील लोक भाजपावर नाराज झालेले असू शकतात.

Updated : 17 May 2023 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top