Home > Max Political > दिल्लीतील राज ठाकरे-अमित शहा बैठकीवर आशिष शेलार काय म्हणाले?

दिल्लीतील राज ठाकरे-अमित शहा बैठकीवर आशिष शेलार काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विकसीत भारताचं स्वप्नं पुढे नेण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे येणार असतील तर त्यांचं स्वागतंच आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

दिल्लीतील राज ठाकरे-अमित शहा बैठकीवर आशिष शेलार काय म्हणाले?
X

Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतल्या भेटीनंतर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी या भेटीवर माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

दोन दिवसापूर्वी मनसे नेते राज ठाकरे हे गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते त्यानंतर दिल्लीत त्यांच्यामध्ये लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीवर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, जो मोदींच्या परिवारात येतो तो घराणेशाहीतच येतो.आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारातलं कुणीतरी निवडणूक लढतंय किंवा लढवणार आहे अशी तरी स्थिती नाही.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विकसीत भारताचं स्वप्नं पुढे नेण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे येणार असतील तर त्यांचं स्वागतंच आहे. या एनडीए मध्ये परिवारवाद, भ्रष्टाचार, घराणेशाही याला स्थान नसल्याचंही यावेळी शेलार यांनी सांगितले.

Updated : 20 March 2024 5:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top