Home > Max Political > शांत बसेल ती दीदी कशी? ममता बॅनर्जी करणार निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

शांत बसेल ती दीदी कशी? ममता बॅनर्जी करणार निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

शांत बसेल ती दीदी कशी? ममता बॅनर्जी करणार निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

 काय आहे नक्की प्रकरण?

शांत बसेल ती दीदी कशी? ममता बॅनर्जी करणार निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन
X

ममता बॅनर्जी यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहें. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेची रणधुमाळी रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच उल्लंघन केल्या प्रकरणी 24 तास पक्षाच्या प्रचार करण्यास बंदी घातली आहे.

प. बंगालमध्ये मुस्लीम मत आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही यासंबंधी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना दोन नोटीसा पाठवल्या होत्या. 

आता ममता बॅनर्जी २४ तास प्रचार बंद म्हटल्यावर शांत बसतील. असा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही चुकत आहात. आपल्या प्रचाराला 24 तास बॅन केल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या या कारवाई विरोधातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय लोकशाहीविरोधी आणि असंविधानिक असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. मंगळवारी कोलकात्यात गांधी मुर्ती या ठिकाणी दुपारी 12 वाजता ते धरणं आंदोलन करणार आहेत. ट्विटरच्या माध्यमांतून ममता बॅनर्जी यांनी या धरणा आंदोलनाची घोषणा केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या एक दिवस निवडणूक प्रचाराला बॅन करण्याचा आदेश मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिला आहे.


Updated : 12 April 2021 8:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top