Home > Max Political > पेन ड्राईव्हला आम्ही एकाच कव्हर ड्राईव्हने मारू - संजय राऊत

पेन ड्राईव्हला आम्ही एकाच कव्हर ड्राईव्हने मारू - संजय राऊत

पेन ड्राईव्हला आम्ही एकाच कव्हर ड्राईव्हने मारू - संजय राऊत
X

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा सभागृहात पेनड्राईव्ह सादर केला आहे आणि गंभीर आरोप केले आहेत. पण आता याला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधीपक्षाची हात मिळवणी चालू आहे, महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही आहे आणि खोट्या प्रकरणातून हे सरकार ऊध्वस्त करायचे प्रयत्न आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

आरोपपत्र परस्पर तयार करतात आणि पण आमच्यावर कोणते आरोप आहेत हे देखील माहिती नसते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का ? त्यांच्या घरात रोज पेन ड्राइव बाळंत होतात का हे बघावे लागेल, या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. हा पेन ड्राईव्ह तो पेनड्राईव्ह आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू असा इशाराही त्यांनी दिला आहे.


Updated : 25 March 2022 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top