संभाजीराजेंशी आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही - संजय राऊत
X
सध्या संभाजी राजे महाविकास आघाडीमध्ये येतील अशी चर्चा असताना संभाजीराजे संपर्क क्षेत्राबाहेर आहेत अशी माहिती समोर आली आहे, अशातच संभाजी राजे हे स्वतंत्र व्यक्ती आहेत, त्यांची राजकारणाविषयी आम्ही फार चर्चा केली नाही पण राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहुमहाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना राज्यसभेवर पाठवावे अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य काही लहान पक्ष मिळुन आमच्याकडे ३२ मतं आहेत तर ८ मतं आम्हाला कमी पडत आहेत. आपण शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो अशावेळी आपल्याला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का ? आणि या विचारांचा जो वारसा आहे त्याला बळ देता येईल का ? यासंदर्भात आम्ही चर्चा करत आहोत असं संजत राऊत म्हणाले.
त्याचबरोबर संभाजी राजे हे राजकारणामध्ये हे राजकारणामध्ये असून त्यांनी एक पक्ष स्थापन केलेला आहे पण गेले काही दिवस आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी माध्यामांश बोलताना दिली.