Home > Max Political > विनोद तावडे सोशल मीडियावरून गायब...

विनोद तावडे सोशल मीडियावरून गायब...

विनोद तावडे सोशल मीडियावरून गायब...
X

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. सत्ता जाताच भाजप पक्षात सुद्धा अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडे अजूनही भाजपमध्येच आहेत का ? असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण सत्तेत असताना सोशल मिडियावर आणि विरोधकांच्या विरोधात सक्रीय असणारे तावडे 'ऑउट ऑफ' दिसत आहे.

राज्यात सत्ता असताना भाजपमध्ये सक्रीय असलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे विनोद तावडे यांना सुद्धा समजलं जायचं. पण विधानसभा निवडणुकीत तावडेंच्या जागी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं. त्यानंतर पुढे त्यांना विधानपरिषदेवर देखील संधी देण्यात आली नाही. त्यामुळे तावडे नाराज असल्याचे बोलले जात होते.

तर नाराजी दूर करण्यासाठी विनोद तावडे यांची हरियाणा राज्याचे प्रभारी म्हणून भाजपने नियुक्ती केली. पण तरीही तावडे सद्या पक्षापासून दुरावले असल्याचं दिसून येत आहे. भाजपकडून राज्य सरकारविरोधात अनेक आंदोलन केले जात असताना, तावडें उपस्थिती दिसत नाही. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांचा हवा तसा सहभाग दिसत नाही.

तावडे नाराज...

आधी विधानसभा आणि त्यानंतर विधानपरिषदेवर सुद्धा तावडेंचा पत्ता कट करण्यात आल्याने, तावडे नाराज असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे पक्षापासून दूर राहण्याच्या त्यांनी निर्णय घेतला असल्याची सुद्धा चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे राज्यभरात ओबीसी आरक्षणावरून भाजपकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात असतनाही, तावडे मात्र गायब असल्याचं दिसत आहे.




सोशल मिडियावर सुद्धा 'ऑउट ऑफ'

ट्विटरवर 7 लाख 35 हजार फॉलोअर्स असलेलं तावडेंच अकाऊंट सुद्धा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. ट्विटरवर त्यांनी शेवटची पोस्ट 29 सप्टेंबर 2020 रोजी केली होती. तर फेसबुकवर सुद्धा वर्षभरापासून त्यांचा अकाऊंटवरून कोणतेही पोस्ट करण्यात आली नाही. त्यामुळे तावडे नेमके आहे तरी कुठे अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

तावडे यांच्याशी आम्ही फोनवरून संपर्क करण्याच्या प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

Updated : 28 Jun 2021 3:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top