Home > Max Political > विधानपरिषद निवडणूक: मतदानाला सुरूवात, कोण आहे मैदानात?

विधानपरिषद निवडणूक: मतदानाला सुरूवात, कोण आहे मैदानात?

विधानपरिषद निवडणूक महाराष्ट्रासह इतर राज्यातही पार पडणार मतदान, आज होणाऱ्या निवडणूकीबाबत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की वाचा

विधानपरिषद निवडणूक: मतदानाला सुरूवात, कोण आहे मैदानात?
X

राज्यात राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणूकीची रंगत वाढली आहे. मतदानाला सुरूवात झाली आहे. तर दहा वाजेपर्यंत 68 आमदारांनी मतदान केले आहे. मात्र ही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. मात्र काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. तर दहा दिवसात ही दुसरी निवडणूक असल्याने भाजप विरुध्द महाविकास आघाडीत चांगलीच चुरस रंगणार आहे. त्यामुळे आता दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर या निवडणूकीत महाविकास आघाडीची दहा मतं फुटल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणूकीत कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारांची यादी

प्रविण दरेकर – भाजप

राम शिंदे – भाजप

श्रीकांत भारतीय – भाजप

उमा खापरे – भाजप

प्रसाद लाड – भाजप

एकनाथ खडसे- राष्ट्रवादी

रामराजे नाईक निंबाळकर- राष्ट्रवादी

आमशा पाडवी- शिवसेना

सचिन अहिर – शिवसेना

चंद्रकांत हंडोरे – काँग्रेस

भाई जगताप – काँग्रेस


20 जून रोजी सकाळी 9 वा विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदानाला सुरूवात झाली. त्यामध्ये पहिले मतदान हे भाजपचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. तसेच आता एकनाथ खडसे, प्रसाद लाड की भाई जगताप यांची विकेट पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Updated : 20 Jun 2022 5:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top