Home > Max Political > विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
X

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव मांडताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी आरक्षण जाण्याला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. छगन भुजबळ यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

हा प्रस्ताव मंजूर होत असताना आमदार गिरिश महाजन आणि आमदार संजय कुटे हे थेट तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोर येऊन घोषणा देऊ लागले. या घोषणा देत असताना भास्कर जाधव यांनी त्यांना समज देखील दिली. मात्र, ही घोषणाबाजी सुरु असतानाच भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा करत, सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं.

त्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बैठक झाली. या बैठकीत तालिकाध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला असून धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे. भाजप नेते धमकी आणि गुंडगिरीचं काम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

यावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले आहेत. कामकाज काढून देण्यासाठी जाणीवपुर्वक केला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.


Updated : 5 July 2021 9:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top