Home > Max Political > दसरा मेळावा: यंदा उद्धव ठाकरेंची डरकाळी हॉलमध्ये

दसरा मेळावा: यंदा उद्धव ठाकरेंची डरकाळी हॉलमध्ये

Venue of shiv sena dussehra rally dasara melava has finally been decided in shanmukhananda hall cm uddhav thackeray

दसरा मेळावा: यंदा उद्धव ठाकरेंची डरकाळी हॉलमध्ये
X

दसरा मेळाव्याची शिवतिर्थावरील सभा म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणी. शिवसैनिक पुर्वी पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकून विचाराचं सोनं लुटत आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा 27 नोव्हेंबर 1966 रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता. तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे.

बाळासाहेबानंतर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची ही परंपरा कायम ठेवली. मात्र, यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दसरा मेळाव्याची सभा शिवतिर्थाऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा पार पडणार आहे.

गेल्या वर्षीही शिवसेनेचा दसरा मेळावा वीर सावरकर सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडला होता.

कोरोनाचं सावट असल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवतिर्थावर दसरा मेळावा होणार नाही. यंदाचा दसरा मेळावा हा बंदिस्त हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

uddhav thackeray, दसरा मेळावा, शिवाजी पार्क, भाजप, संजय राऊत

Updated : 11 Oct 2021 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top