Manoj Jarange यांना जालना मतदारसंघातून उमेदवारी द्या, वंचितचा मविआला प्रस्ताव
X
आगामी लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीला प्रस्ताव देण्यात आला आहे. यामध्ये वंचित कडून चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना उमेदवारी जाहीर करावी असा प्रमुख प्रस्ताव दिला आहे. यासोबतच वंचित कडून पुढील मुद्दे मांडण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत.
महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडमूकीपूर्वी आणि निवडणूकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान ०३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.
इत्यादी मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी या प्रस्तावामार्फत केल्या आहेत.