Home > Max Political > महाविकास आघाडीच्या सभेत वंचित अनुपस्थित

महाविकास आघाडीच्या सभेत वंचित अनुपस्थित

महाविकास आघाडीच्या सभेत वंचित अनुपस्थित
X

पुणे : पुण्यात महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट च्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडी अनुपस्थित असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचे सर्व नेते मंचावर उपस्थित असताना वंचित बहुजन आघाडीचे कोणतेही नेते ह्या सभेदरम्यान उपस्थीत नव्हते.

काही दिवसांपूर्वीच महाविकस आघाडी इंडिया फ्रंटमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यानंतर महाविकस आघाडी इंडिया फ्रंटची पहिली सभा पुण्याच्या काँग्रेस भवन येथे पार पडली या सभेदरम्यान आघाडीतील सर्वपक्ष आणि इतर घटक पक्ष उपस्थित होते. मात्र वंचित बहुजन आघाडी या सभेच्या वेळी अनुपस्थित आसल्याने चित्र समोर आले आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या बॅनरवर देखील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचे फोटो दिसले नाहीत व पक्ष चिन्हही दिसले नाही.




या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सचिन आहीर, यांसह आम आदमी पार्टीचे नेते व इतर घटक पक्ष ही उपस्थीत होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व त्यांचे इतर नेते उपस्थित नव्हते. एवढेच नाही तर

महाविकास आघाडी इंडिया फ्रंट च्या बॅनरवर देखील वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख नसल्याने वंचित बहुजन आघाडी, महाविकस आघाडी इंडिया फ्रंट मध्ये नाही का ? आश्या चर्चांना उधाण आले होते.

Updated : 24 Feb 2024 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top