Home > Max Political > प्रियंका गांधी यांची 10 लाखांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा, आजारी कॉंग्रेसला बाहेर काढणार का?

प्रियंका गांधी यांची 10 लाखांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा, आजारी कॉंग्रेसला बाहेर काढणार का?

प्रियंका गांधी यांची 10 लाखांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा, आजारी कॉंग्रेसला बाहेर काढणार का?
X

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी आश्वासनाचा काळ सुरु झाला आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पुन्हा एक आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची सरकार आली तर कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी १० लाख रुपयांचा उपचार मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. या अगोदर प्रियंका गांधी यांनी बाराबंकीमध्ये काँग्रेसच्या ७ प्रतिज्ञाची घोषणा केली होती.

प्रियंका यांनी आता ट्वीट करत मोफत उपचाराची घोषणा केली आहे.

काय म्हटलंय प्रियंका गांधी यांनी?

कोरोना काळात सध्या उत्तर प्रदेशात ताप, सर्दी इतर आजारांसाठी सरकारची आरोग्य व्यवस्था आपण सगळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या जनतेला स्वस्त दरात आणि चांगला उपचार मिळावा यासाठी काँग्रेस समितीच्या मान्यतेनुसार उत्तर प्रदेश जनतेला १० लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसची सत्ता उत्तर प्रदेशात आल्यावर कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी १० लाख रुपयांपर्यंत फ्री उपचार करण्यात येईल.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी बाराबंकी या ठिकाणाहून प्रतिज्ञा यात्रेची सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सात प्रतिज्ञा सांगितल्या होत्या. तसेच निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वेगळी घोषणा केली जाईल.

काय आहेत ७ प्रतिज्ञा?

१. येत्या निवडणुकांत महिलांना ४० टक्के उमेदवारी देणार.

२. शालेय मुलींना स्मार्टफोन आणि स्कूट देणार.

३. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करणार.

४. २० लाख सरकारी रोजगार निर्माण करणार

५. सगळ्यांचे वीज बिल अर्ध माफ करणार

६. कुटुंबियांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार

७. २५०० रुपयांत गहू-धान्य तर ४०० रुपयात ऊस खरेदी करणार.

मात्र, या घोषणा करुनही कॉंग्रेसला जनता स्विकारणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Updated : 25 Oct 2021 7:49 AM GMT
Next Story
Share it
Top